मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ६५ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेला ६ जागा मिळाल्या आहेत. मात्र त्यांचा महापौर बसणार नाही. कारण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेली नाही. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत महायुतीच्या विजयावर शंका उपस्थित केली आहे.
उध्दव ठाकरे काय म्हणाले?
अत्यंत घाणेरड्या पध्दतीने निवडणुका लढवल्या गेल्या
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून लढवल्या गेल्या. जणू काही प्रत्येक निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे, अशापद्धतीने साम-दाम-दंड-भेद याच्या पलिकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला. पैशांची लालस, लालूस दाखवले, आमिष दाखवले, आमच्या काही शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटीसा दिल्या, काही जणांना अटक झाली, काही ठिकाणी दंगडी भडकवण्याचे प्रयत्न झाले.
आमच्या उमेदवारांना पैशाची आमिष देण्यात आली
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथील आमच्या काही उमेदवारांना पैशाची आमिष देण्यात आली. काही ठिकाणी जोर-जबरदस्तीने उमेदवारी मागे घ्यायला लावली. मात्र या सगळ्या गुंडागर्दीला न घाबरता ज्या-ज्या उमेदवारांनी लढत दिली आणि ज्या-ज्या मतदारांनी निर्भिडपणे मतदान केले. हे सगळेजण खरोखरच लोकशाहीचे रक्षक आहेत.
एका गणिताचे उत्तर मला मिळाले नाही
एका गणिताचे उत्तर मला मिळाले नाही. विधानसभेच्या वेळी मोदींची सभा झाली, यावेळी फडणवीसांची सभा झाली पण खुर्च्या रिकाम्या होत्या. मी आणि राजने सभा घेतली त्याला प्रचंड प्रतिसाद होता. त्यांच्याकडे रिकाम्या खुर्च्यांनी कसे काय मतदान केले हे कोडे आहे. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच त्यांनी जे काही पैशांचे वाटप केले त्यामागे पैशांचे वाटप आहे. आमचे निवडून आलेले नगरसेवक गळाला लावले होते, ते आता गाळात गेले. विकास निधीच्या नावाखाली पैसे वाटले. प्रेशर कूकर, साड्या, इतर गोष्टी वाचल्या. हा पैसा येतो कुठून? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
महाराष्ट्रातील घवघवीत यशानंतर खासदार असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडलाय
मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच व आजही आहे. परंतु तो आकडा आम्ही आज तरी गाठू शकलो नाही. पण त्यांच्या सर्व खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागला आहे किंवा जे काही यश शिवशक्तीने मिळवले आहे, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडलाय, हे मात्र नक्की. कारण त्यांनी एकही प्रयत्न सोडला नाही, जिथे शिवसेना नामोहरण होणार नाही.
कागदावर शिवसेना संपवली असेल पण…
“भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही. भाजप हा कागदावर आहे जमिनीवर नाही. तो जर जमिनीवर नसता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते. प्रचंड पैशाांच्या धबधब्या समोर मतदार झुकला नाही. २५ वर्ष आम्ही मुंबईची सेवा केली, त्यामुळे माझी काही अपेक्षा मुंबई होता. ज्या काही सेवा केली, सुधारणा केली, त्या लोकांसमोर ठेवल्या होत्या, कोविड मॉडेलची प्रशंसा झाली. मला असं वाटलं की मुंबईकर अधिक आशीर्वाद देतील. पण ठीक आहे, मतं कमी दिली नाही. पण मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे. मराठी पट्यात शिवसेनेचा आशीर्वादाचा हात तसाच ठेवला आहे’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मतदानाचे आभार मानले.




