Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसरकारला जोडे मार…; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उध्दव ठाकरेंचा संताप

सरकारला जोडे मार…; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उध्दव ठाकरेंचा संताप

मुंबई | Mumbai
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच राजकोट किल्ल्यावर आज मोठा राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी हा राडा घडला. राणे समर्थक मुख्य द्वारावर जमले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंची वाट अडवून धरली होती. अखेर पोलीस बंदोबस्तात दीड तासानंतर आदित्य ठाकरे खाली उतरले. या घटनेवर आता उध्दव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“वाऱ्याने पुतळा पडला कारण हे निर्लज्जपणाच कळस गाठणारे सरकार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असे कळले नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगले घडेल” असे उद्धव ठाकरे म्हणाले. “१ सप्टेंबरला दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून. गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. मी आहे तिथे. पवारसाहेब असतील नाना पटोले असतील. सर्व शिवप्रेमींनी यावे अशी विनंती आहे” शिवपुतळा कोसळण्याची घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेय. मोदी- शहा यांच्या दलालांनी रस्ता अडवला अशी परखड टीकाही ठाकरेंनी केलीय.

- Advertisement -

भ्रष्टाचाराने कळस गाठला
महाराष्ट्रात एकप्रकारची अस्वस्थता आहे. दिव सागणिक महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार वाढत आहे. काल परवा जे घडला ते कधीही घडलं नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात कोसळला. एकूणच हे जे काही महाफुटीचे सरकार आहे, यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे आणि कारभाराने किळस आणला आहे या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंदचा पुकार दिला होता. कोर्टाच्यामाध्यमातून त्यावर बंदी आणली. आता महाविकास आघाडीतर्फे मालवण येथे जो पुतळा समुद्रात कोसळला, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्यामध्ये मोदी-शहांच्या दलाला आणि काही शिवद्रोही रस्ता अडवून बसले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...