Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर

उद्धव ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज, रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवीचे दर्शन घेऊन ठाकरे आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.

- Advertisement -

आज रविवारी ठाकरे हे यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या, सोमवारी ठाकरे हे अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यातकाही स्थानिक नेत्यांचे पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या