Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याUddhav Thackeray : "इंडिया आघाडीचे नेतृत्व पक्षप्रमुखांनी नव्हे तर..."; उद्धव ठाकरेंनी व्यक्त...

Uddhav Thackeray : “इंडिया आघाडीचे नेतृत्व पक्षप्रमुखांनी नव्हे तर…”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले मत

मुंबई | Mumbai

आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून त्या पार्श्वभूमीवर आतापासून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए (NDA) आणि विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’मध्ये सरळ लढत होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे…

- Advertisement -

Landslide : शिवभक्तांवर काळाचा घाला; मंदिरावर दरड कोसळून ९ भाविकांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखालील तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता आणण्यासाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीने (India Alliance) भाजपला २०२४ च्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच दृष्टीने इंडिया आघाडीच्या दोन बैठका अनुक्रमे पाटणा आणि बंगळूरू येथे झाल्या आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; शिमल्यात भूस्खलन, ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले

त्यानंतर आता मुंबईत तिसरी बैठक पार पडणार असून बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपले मत व्यक्त केले असून त्यांनी म्हटले आहे की, “पक्षप्रमुखाने इंडिया आघाडीचे संयोजक होऊ नये. नव्या पिढीकडे नेतृत्व देण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये तिसऱ्या फळीतील नेत्यांना संयोजकपदी नेमावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

भाजपकडून शरद पवारांना ‘या’ दोन मोठ्या पदांच्या ऑफर; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, इंडिया आघाडीतील नेत्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी इंडिया आघाडीच्या नेत्यांना एकत्र बांधण्यात वरिष्ठ नेत्यांचा कस लागणार आहे. अशातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरील मत व्यक्त केल्याने त्यांच्या या मताकडे देशभरातील इंडिया आघाडीचे नेते कसे पाहतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या