मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यातून (Dasara Melava) शिवसेनेतील (Shivsena) ठाकरे गट व शिंदे गट यांनी एकमेकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व भाजपच्या (BJP) राज्यातील नेत्यांबरोबरच मोदी सरकारवरही निशाणा साधला होता.अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केले आहे….
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांकडून नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला अटक
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आले त्यांचे स्वागत आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवावा ही विनंती आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घ्यावी पण पर्याय सुद्धा सांगावा. शपथ घेऊन भावनिक वातावरण निर्माण केले जात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच मराठा आरक्षणावर खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन
तसेच ठाकरे गटात होणाऱ्या पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमच्या पक्षातून बाहेर जाणारे सत्तेच्या दिशेने जात आहेत तर पक्षात येणारे सत्ता आणण्याच्या दिशेने येत आहेत. काल एकनाथ पवार भाजपमधून आले, आज चंगेज खान आले. येत्या काही दिवसांत आणखी काही जण येतील. राजकारणाचा झालेला खेळखंडोबा कुणालाही पटत नसल्यामुळेच ते येत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड; मनोज जरांगे पाटलांच्या अटकेची केली मागणी