Friday, February 6, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीत ठाकरे गट २८८ जागा 'स्वबळावर' लढण्याच्या तयारीत? संपर्कप्रमुखांसोबतच्या बैठकीत काय...

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट २८८ जागा ‘स्वबळावर’ लढण्याच्या तयारीत? संपर्कप्रमुखांसोबतच्या बैठकीत काय झालं?

मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या जास्त जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. राज्यभरातील २८८ विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवनामध्ये झाली. यामध्ये प्रामुख्याने संपर्कप्रमुखांकडून विधानसभा निहाय माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. आठवडाभरात या सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निकालावरून मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढवली तर काय होईल यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी अहवाल मागवला आहे.विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसंच संभाव्य विजयाचं समीकरण कसं असेल? याबाबतही ठाकरेंनी अहवाल मागवला आहे. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वत:च्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी यांनी काम केलं की नाही? याबाबतचा अहवालही ठाकरेंनी मागवला आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वतःच्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी यांनी काम केलं की नाही याबाबतचा अहवाल उद्धव ठाकरेंकडून मागवण्यात आला आहे.

YouTube video player

विधानसभा संपर्कप्रमुख असा बनवणार अहवाल
1 लोकसभा निवडणूक २०२४ चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल.
2 यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न होण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?

3 शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?
4 महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?
5 सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?
6 संभाव्य विजयाचे समिकरण कसे असेल?

7 फक्त शिवसेना लढली तर काय होईल?
8 मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास, आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?
9 BLA एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

महापौरपदी

Nashik News: मोठी बातमी! नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर पदी...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६) निवडणूक पार पडली असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कुंभनगरीच्या १७ व्या महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके...