Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्या“देवेंद्रजी, कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा...”; उद्धव ठाकरे यांचा गर्भित...

“देवेंद्रजी, कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा…”; उद्धव ठाकरे यांचा गर्भित इशारा

मुंबई | Mumbai

देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गर्भित इशारा दिला आहे.

- Advertisement -

मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुरु असलेल्या कारवाईवरुन टीका केली. चौकशीला आम्ही घाबरत नाही. नियमाच्या पुढे जावून काही गोष्टी कराव्या लागतात असं यावेळी त्यांनी सांगितलं. सध्या ते कोविड काळातील भ्रष्टाचार काढत आहे. पण त्या काळात जे काही सर्व्हे झाले त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नेहमी पहिला क्रमांक आला ही यांची पोटदुखी आहे. भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्यांचं नाव त्या यादीत नव्हतं. या पोटदुखीसाठी त्यांना या निवडणुकीत जमालगोटा द्यावा लागेल. यांना घोड्यांचेच औषध द्यावे लागेल. एकदाच कोटा व्यवस्थित साफ करावा लागेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की “करोना काळातील घोटाळ्याच्या नावे सध्या बोभाटा सुरु आहे. सूरजच्या घरावर धाड टाकली. तो एक साधा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबाला धक्का असं बोललं जात आहे. यांच्या मनात किती भीती बसली आहे. मी पाटण्याला गेलो तर लगेच फडणवीस हे परिवार बचाओ बैठकीला गेलेत असं म्हणाले. या पातळीवर येऊ नका. देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. तुमच्या परिवाराचे काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. त्यावर बोलावं लागलं तर नुसतं शवासन करावं लागेल. इतर आसनं तुम्हाला झेपणार नाहीत. त्यामुळे माझ्या परिवारावर बोलू नका. त्याबद्दल मी संवेदनशील आहे. संपूर्ण महाराष्ट्र, शिवसैनिक माझा परिवार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. आता तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कोणी दुसरं घेत असेल तर मला माहिती नाही”.

- Advertisment -

ताज्या बातम्या