Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये, दोन...

Uddhav Thackeray : “गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये, दोन ठग महाराष्ट्र लुटताहेत…”; उध्दव ठाकरेंचा महायुतीतील नेत्यांवर घणाघात

मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये, हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटताहेत” असे म्हणत निशाणा साधला आहे. तसेच “मुलगी शिकली प्रगती झाली आणि १५०० देऊन घरी बसवली” असे म्हणत ठाकरेंनी खोचक टोला देखील लगावला आहे. दादरमध्ये राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेला सुरुवात झाली असून या परिषदेमध्ये नागरी व सामाजिक संघटना, विचारवंत, साहित्यिक कलावंत कार्यकर्ते यांच्यासमक्ष भाषण करताना उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजना, भ्रष्टाचार, हरयाणा-जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल, महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपद आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

“शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. हे दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत. या लुटीतून जाहिरातबाजी करत आहेत. फेक नरेटिव्ह जाहिरातीच्या माध्यमातून दाखवत आहेत. खोटे आकडे दाखवून जाहिरात करत आहेत. एसटीवर जाहिरात केली जात आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली. १५०० देऊन घरी बसवली. कारण रोजगार नाही”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

जुमलेबाजीमध्ये लोकं बघत आहेत, एक एक योजना जाहीर करताय आणि समारंभ करत आहेत. या कार्यक्रमातून विचारतात, मिळाले का पैसे तुम्हाला? अरे तुझ्या घरचे पैसे आहेत का? तू गद्दारी केली ५० कोटी घेतले आणि बहिणीला १५०० रुपये देतो, असे म्हणत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच, ७० हजार कोटींचा घोटाळा आता लाजतो, एवढे घोटाळे यांनी केले आहेत.

कोरोना काळात मी केलेले काम मी केलेय. ते पाहा. त्यात कमी असेल तर मी तोंड दाखवणार नाही. कोरोना काळात घोटाळा झाला असे म्हणता अरे तुमच्या पीएम केअर फंडचे काय झाले. त्या घोटाळ्यावर बोला. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. हे दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत. या लुटीतून जाहिरातबाजी करत आहेत. फेक नरेटिव्ह जाहिरातीच्या माध्यमातून दाखवत आहेत. खोटे आकडे दाखवून जाहिरात करत आहेत. ५० कोटी लोकांना गॅस सिलिंडर दिल्याचे सांगतात. प्रत्येकाला वाटते कुणाला तरी मिळाले असेल त्याला मिळाले असेल, असेच सुरू आहे. प्रत्यक्षात कुणाला काही मिळालेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“योजनांचा पाऊस पाडत आहेत. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. योजना धडाधड सुरू करत आहेत. आमच्या हक्काचे पैसे ढापले. सरकार स्थापन करताना ५० खोके घेतले. गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये. फोडाफोडी, गद्दारी करताना लाज वाटली नाही. आता आमचेच पैसे आम्हाला. हा आमचा महाराष्ट्र धर्म नाही.”

“सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. मग आज तीच वेळ आली आहे. मराठी म्हणजे आम्ही आहोतच, पण तुम्ही आता म्हणालात की तुमचीही मातृभाषा मराठी आहे. हे सर्व इथे जन्मलेले आहेत आणि वर्षानुवर्षे इथे राहत आहेत, त्यांना आम्ही मराठी मानतो आहोत. पण ते मराठी मानून आमच्यासोबत येत आहेत की नाही हा प्रश्न त्यांनाही विचारण्याची गरज आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सगळे महाराष्ट्रचे उद्योग गुजरातला गेले, तुषार जी हे मी नाही म्हणत तुमच्या भाषेत जे दोन ठग आहेत ते हे विष कालवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने भाजपला गुडघ्यावर बसवलं आहे, योजना आहेत पण धोरण नाही, किती काळ १५०० रुपये घेऊन आपली बहीण बेक्कार भावाला सांभाळणार. जशी क्रांती आधी बुलेटने झाली, ती आता बॅलेटने करायची आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...