Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या“निवडणूक आयोगाने गुलामी केली, या गुलामांना मी आव्हान देतो की…”; उद्धव ठाकरे...

“निवडणूक आयोगाने गुलामी केली, या गुलामांना मी आव्हान देतो की…”; उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisement -

त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रमाणे पहिल्या दसरा मेळाव्यात मोटारवर उभं राहून उपस्थितांना संबोधित केलं होतं, त्याच प्रमाणे उद्धव ठाकरेही शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. यावेळी कलानगर परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी शिंदे गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य निवडणूक आयुक्तांवरही जोरदार प्रहार केले.

“महिलेचा अपमान करणाऱ्याला…” पक्ष आणि चिन्ह गेल्यावर उद्धव ठाकरेंवर कंगना रनौतचा निशाणा

‘निवडणूक आयोगाने काल गुलामी केली. निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यावर एखाद्या राज्याचे राज्यपाल होऊ शकतात. कारण आत्ताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. असे गुलाम त्यांनी अवतीभोवती ठेवले आहेत. मी या गुलामांना आव्हान देतो की, शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राच्या मालकांनी ठरवण्याची वेळ आली आहे.’ असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘या पुढं चोरबाजारांच्या मालकाला आणि चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय रहायचं नाही. हा योगायोग नाही. आज महाशिवरात्र आहे उद्या शिवजयंती आहे, जणू काही या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलंय, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे. पण ज्यांनी हे चोरलंय त्यांना हे माहिती नाही की त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेला मधाचा आस्वाद घेतला आहे पण त्यांना अद्याप मधमाशांचा डंख लागलेला नाही. तो डंख आता करायची वेळ आलेली आहे.’

ठाकरेंना अजून एक धक्का! मशाल चिन्ह आणि पक्षाचं नाव फक्त कसबा-चिंचवड निवडणुकीपर्यंतचं…

तसेच, ‘ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोरांना दिलं गेलं. ज्या पद्धतीनं हे कपट कारस्थान करत आहेत त्यानुसार कदाचित हे आपलं मशाल चिन्ह देखील काढून घेतील. माझं आव्हान आहे की सर्वांच्या साक्षीनं की ज्यांनी धनुष्यबाण चोरलेले मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन मैदानात याव मी मशाल घेऊन मैदानात येतो,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गेलं… शिवसेना भवनाचं काय?; राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार, खासदार आणि नेते उपस्थित होते. अनंत गिते, चंद्रकांत खैरे देखील यावेळी दिसून आले. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना देखील महाशिवरात्रीपूर्वी आपला शिवधनुष्य देखील चोरीला गेल्याचं सांगितलं. आपल्याला लढा द्यायचा असल्याचं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या