Friday, November 22, 2024
Homeराजकीय"मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरे १५ दिवसांत…"; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

“मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरे १५ दिवसांत…”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई | Mumbai

मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा (Loksabha) निवडणुकीची रणधुमाळी काल शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर थांबली आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ४ जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत. मात्र, त्याआधी काल (दि. १ जून) रोजी विविध संस्थाचा एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचे (NDA) सरकार येणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हा एक्झिट पोल ‘मोदी मीडियाचा पोल’ असल्याचे म्हणत देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात (Maharashtra) महायुतीला (Mahayuti) चांगल्या जागा मिळतील असा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहे. अशातच आता राज्यातील भाजपच्या सहयोगी पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी ‘देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे मोदींसोबत येतील’ असे म्हणत उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आमदार राणा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) खिडकी उघडी ठेवली आहे. मी आता जबाबदारीने सांगतो आहे की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये असतील. कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे. देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. तसेच देशातील सर्व विरोधक हे पंतप्रधान मोदींची स्तुती करतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राणा यांनी केलेल्या दाव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनीही यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “या गोष्टी जर तरच्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावं की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसेच त्यांना घ्यावं की नाही हे ठरवणारे उद्धव ठाकरे नाही तर ते नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे आहेत. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये राहायचे नाही हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे उद्या ते आले तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. त्यामुळे आता यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या