Tuesday, January 6, 2026
Homeराजकीयअंबानींच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरेंचा डान्स, विरोधकांकडून झाले टीकेचे धनी

अंबानींच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरेंचा डान्स, विरोधकांकडून झाले टीकेचे धनी

मुंबई । Mumbai

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अबांनी (Anant Ambani) यांच्या लग्नसोहळ्याचे कार्यक्रम सध्या मुंबईतील (Mumbai) वांद्रे-कुर्ला संकुलामधील जीओ वर्ल्ड (Jio World) येथे पार पडत आहेत. या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ, फोटो आणि त्यासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत.

- Advertisement -

यातच आता सोशल मीडियावर (Social Media) अंबानींच्या या लग्न सोहळ्यामधील सेलिब्रिटींच्या गर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण पिढीमधील महत्त्वाचं नाव असलेल्या तेजस ठाकरेंनीही (Tejas thackeray) डान्स केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अंबानींच्या या लग्न सोहळ्यातील व्हिडीओमध्ये एका हिंदी गाण्यावर नाचणारी व्यक्ती तेजस ठाकरे आहेत.

YouTube video player

हे देखील वाचा : मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?; वरळी अपघातावरुन राऊतांचा हल्लाबोल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Tejas thackeray Viral Video) होत आहे. तेजस ठाकरे यांनी केलेल्या नृत्याचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल होताच विरोधकांनी त्यांना टीकेचे धनी केले आहे. भाजपा मुंबई (BJP Mumbai) प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Police Recruitment : प्रश्न आणि उत्तरांच्या पर्यायात संदिग्धता

“जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही.. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत. जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही. “गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही.. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…!”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.ते पुढे म्हणाले, “हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले. असो.. हे नृत्य पण कसे “जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे “संजयकाका” महाराष्ट्राला पटवून देतीलच…!”

भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपल्या एक्स पोस्ट वर “आता म्हणा तेजस ठाकरेला गुजरातने पळवला… साला नाच्या ठाकरे “अशा शब्दात त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

त्याचबरोबर “अरे… अंबानींच्या लग्नातला हा background डान्सर ओळखीचा दिसतोय… . . हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव, तेजस ठाकरे …उत्तम कला आहे एकेकाजवळ… वडील नटसम्राट…लेक नृत्यसम्राट… एकापेक्षाएक” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर तेजस ठाकरे यांचा व्हिडिओ पोस्ट करत अशा शब्दात टीकेचे बाण सोडले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...