Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउज्जैनच्या शिष्टमंडळाने घेतली सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची माहिती

उज्जैनच्या शिष्टमंडळाने घेतली सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची माहिती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे २०२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय शिष्टमंडळाने आज नाशिक येथे येत कुंभमेळ्याच्या नियोजनाची माहिती घेतली. तसेच त्यांनी सुरू केलेल्या तयारीची माहिती दिली.

YouTube video player

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे २०२८ मध्ये कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी मध्य प्रदेशचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय दुबे, उज्जैनचे विभागीय आयुक्त आाशिष सिंह, उज्जैनचे जिल्हाधिकारी रोशनकुमार सिंह, उज्जैन महानगरपालिकेचे आयुक्त अभिलाष मिश्रा यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा नियोजनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात ही भेट झाली. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कुंभमेळा आयोजनासंदर्भात गठित करण्यात आलेल्या मंत्री समिती व कुंभमेळा प्राधिकरणाच्या रचनेबरोबरच नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. त्यात रस्ते, घाटांचा विस्तार, मल नि:स्सारण प्रकल्प, रामकाल पथ, त्र्यंबकेश्वर उपसा सिंचन योजना, वाहनतळ, रेल्वे, विमान, रस्ते वाहतुकीची सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, शौचालये, साधूग्राम, सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त, गर्दी नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली.

आयुक्त खत्री यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. याबरोबरच उज्जैनच्या शिष्टमंडळातर्फे अपर मुख्य सचिव दुबे, जिल्हाधिकारी सिंह यांनी कुंभमेळा नियोजनाची सविस्तर माहिती देत उज्जैन येथे भेट देण्याचे निमंत्रण आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर या पथकाने तपोवन, मल नि:स्सारण प्रकल्प, रामकुंड परिसरास भेट देऊन पाहणी केली.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...