Friday, May 3, 2024
Homeजळगावपाळधी ते फागणे चौपदरी रस्त्यासाठी 15 मे पर्यंतचा अल्टीमेटम

पाळधी ते फागणे चौपदरी रस्त्यासाठी 15 मे पर्यंतचा अल्टीमेटम

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

बहुप्रतिक्षेत असलेल्या तरसोद ते फागणे (Tarsod to Fagane) या चौपदरीकरणाचे (four-lane) काम संथ गतीने सुरू आहे. दरम्यान पाळधी ते फागणे (Paladhi to Phagne) हा चौपदरी रस्ता (four-lane road) येत्या 15 मे पर्यंत पुर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला (Open to traffic) करण्याचा अल्टीमेटम (Ultimatum) केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री (Union Road Transport Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी संबंधित यंत्रणांना दिला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातुन जाणार्‍या महामार्ग चौपदरीकरणासाठी (four-lane road) दोन टप्पे करण्यात आले होते. त्यात तरसोद ते चिखली (Tarsod to Chikhali) या टप्प्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले असुन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला (Open to traffic) करण्यात आला आहे. तर दुसर्‍या टप्प्यात तरसोद ते फागणे (Tarsod to Fagane) असे काम प्रस्तावित होते. हे काम अ‍ॅग्रोह कन्स्ट्रक्शन या कंपनीला सोपविण्यात आले असुन 84 किमीच्या या महामार्ग चौपदरीकरणात अनेक अडथळे (Many obstacles) निर्माण झाले. कधी मक्तेदार तर कधी शेतकरी यांच्या भूमिकेमुळे तरसोद ते फागणे चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणार्‍या वाहतुकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ना. गडकरींनी दिला अल्टीमेटम

केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री (Union Road Transport Minister) ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे दि. 20 रोजी आ. गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहानिमित्ताने जळगाव दौर्‍यावर होते.

या दौर्‍यात त्यांनी जळगाव विमानतळावर जळगाव, धुळे, नंदुरबार या तिनही जिल्ह्यातील रस्ते कामाचा आढावा (Review of road works) घेतला. या बैठकीसाठी तिनही जिल्ह्यांचे प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तरसोद ते फागणे या महामार्ग चौपदरीकरणावर चर्चा झाली. त्यात ना. गडकरी यांनी ाळधी ते फागणे हा चौपदरी रस्ता येत्या 15 मे पर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर बायपासचे काम हे डिसेंबरपर्यंत पुर्ण करण्याच्या सुचनाही ना. गडकरी यांनी दिल्या असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या