Saturday, July 27, 2024
Homeनगरउंबरे येथे धाडसी चोरी

उंबरे येथे धाडसी चोरी

उंबरे |वार्ताहर| Umbare

उंबरे (Umbare) येथे 14 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन तोळे सोने (Gold), तीन मोबाईल असा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्यामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

नवरात्रोत्सवासाठी मोहटादेवीगड सज्ज

उंबरे येथील वांबोरी मोरवाडी रस्त्यावर राहणारे ज्ञानदेव माधव ढोकणे यांच्या वस्तीवर पहाटेच्या सुमारास सर्वजण घरात झोपेत असतानाच चोरट्यांनी डल्ला (Theft) मारून दोन तोळे सोने, तीन मोबाईल घेऊन पोबारा केला. रात्री ढोकणे यांनी दरवाजाला कुलूप लावले नव्हते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे काही चोरटे रस्त्याला तर एक जण आत मध्ये गेला. त्याने प्रथम सर्व मोबाईल स्विच ऑफ केले व घरातील काही बॅग उचलून रस्त्यावर साथीदारांकडून दिल्या. या वेळेस घराचे मालक ज्ञानदेव ढोकणे हे लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला आले असता त्यांना तिथे आपल्या घरातील पर्स आढळल्या.

30 ऑक्टोबरला निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी

परंतु त्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांनी त्या पर्स उचलल्या व घरात नेऊन ठेवल्या. ते पुन्हा झोपले, असे असताना घरातून एक चोर बाहेर जाताना त्यांना दिसला. त्यांना वाटलं आपलाच मुलगा आहे म्हणून त्यांनी त्याला हटकले नाही. पुन्हा तो चोर पंधरा-वीस मिनिटांनी घरात आला व घरातील दागिने घेऊन बाहेर निघाला. त्यावेळी ढोकणे यांना शंका आली व त्यांनी आरोळी दिली असता चोरट्यांनी त्या ठिकाणी पळ काढला. त्यांच्या कुटुंबातील मुलांनी त्यांचा पाठलाग केला परंतु अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. यानंतर तातडीने गावातून आप्पासाहेब ढोकणे यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देऊन सर्व नागरिकांना सावध केले.

डांबरात फसलेला मेंढपाळ बचावला, चार शेळ्यांचा मृत्यू

पोलिसांशी संपर्क केल्यानंतर अर्ध्या तासात राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक उंबरे येथे दाखल झाले. मात्र, चोरटे पसार झाल्यामुळे त्यांचा कुठेही शोध लागला नाही. गावातील प्रत्येक नागरिकांनी झोपताना सावधानतेने आपापले दरवाजे कुलूप लावून घेण्याची गरज आहे. चोरटे त्या संधीचा फायदा घेतात, यापुढे सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहनही ग्रामस्थांना पोलिसांनी केली आहे.

आ. थोरातांच्या रेट्यामुळेच डाव्या कालव्यातून पाणी सुटले

- Advertisment -

ताज्या बातम्या