Saturday, July 27, 2024
Homeनगरसावेडीत अनधिकृत गॅस रिफीलींगचा उद्योग फोफावला

सावेडीत अनधिकृत गॅस रिफीलींगचा उद्योग फोफावला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विनापरवाना गॅस टाक्यांमधून गॅस रिफीलींग करून मशीनद्वारे वाहनांमध्ये भरत असल्याचा उद्योग अहमदनगर शहरात सुरू आहे. पुरवठा विभागाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सावेडी उपनगरात एका ठिकाणी कारवाई केल्यानंतर बोल्हेगाव उपनगरात कारवाई केली. यानंतर बुधवारी सावेडी उपनगरात दोन ठिकाणी छापेमारी करत रिफीलींगचा उद्योग बंद केला. याप्रकरणी प्र.पुरवठा निरीक्षक जयंत भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सहकारनगर परिसरातील यशश्री स्कूल शेजारी एका जागेत एका शेडमध्ये अनधिकृत गॅस रिफीलींगचा उद्योग सुरू असलेल्या ठिकाणी पुरवठा विभागाने कारवाई केली. सदर ठिकाणी दोन वर्षांपासून शाहरूख निसार शेख (वय 26 रा. भिंगादिवे मळा, सावेडी) हा अवैध व्यवसाय करत असल्याचे समोर आले. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनानगर चौकातील एका गॅरेजच्या मागील बाजूस शुभम उर्फ सनी दत्ता शिंदे (रा. वैदुवाडी, सावेडी) हा अनधिकृतरित्या घरगुती वापराच्या गॅस टाकीमधून गॅस रिफीलींग करून मशीनच्या सहाय्याने वाहनामध्ये भरत असल्याचे पुरवठा विभागाच्या कारवाईतून समोर आले. पथकाने सदर ठिकाणी कारवाई करत रिक्षा, गॅस टाक्या, पाईप, मशीन असे साहित्य जप्त करत शिंदे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या