Tuesday, February 3, 2026
HomeनगरCrime News : अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणार्‍या महिलेचा विनयभंग

Crime News : अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणार्‍या महिलेचा विनयभंग

टोईंग कारवाई दरम्यान प्रकार || तरूणाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील आकाशवाणी केंद्रासमोर अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणार्‍या महापालिकेच्या महिला ठेकदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (19 जानेवारी) रात्री घडली. याप्रकरणी पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कपिल पगारे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. महानगरपालिकेच्या खासगी कंत्राटानुसार अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करण्यासाठी फिर्यादी महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली इतर महिला कर्मचारी कार्यरत आहेत. सोमवारी रात्री त्या त्यांच्या कर्मचार्‍यांसह प्रोफेसर चौक भागात गस्तीवर होत्या. यावेळी आकाशवाणी केंद्रासमोरील एका मोबाईल दुकानासमोर एक दुचाकी रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने उभी असल्याचे त्यांना दिसले.

YouTube video player

वारंवार सूचना देऊनही पगारे याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि उलट महिला कर्मचार्‍यांकडे पाहून हसू लागला. जेव्हा महिला कर्मचार्‍यांनी ती दुचाकी टोईंग वाहनावर उचलण्यास सुरूवात केली, तेव्हा पगारे याने संतापून फिर्यादी महिलेला घाणेरड्या भाषेत बोलून त्यांचा अपमान केला. महिलेने विचारणा केली असता, त्याने जिवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा शिवीगाळ केली. या प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अंमलदार चांगदेव आंधळे तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

प्रफुल्ल

Praful Patel: राष्ट्रीय नेता निवडीपासून ते पक्षाचे विलिनीकरण, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच...

0
मुंबई | Mumbaiमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्त्वाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा...