Friday, November 15, 2024
Homeजळगावनरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आदिवासी भागात विकास पोहचला-अमोल जावळे

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आदिवासी भागात विकास पोहचला-अमोल जावळे

रावेर । प्रतिनिधी

रावेर विधानसभेतील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी सातपुड्यातील आदिवासी भागात भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आदिवासी भागात झालेले विकासकामे मतदारांना सांगितली. अमोल जावळे यांनी मतदारांना आश्वस्त केले की, महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली आणखी विकासाच्या योजना राबवल्या जातील आणि आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहतील.

- Advertisement -

गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारने आदिवासींसाठी अत्यंत प्रभावी योजना राबवल्या आहेत. मोफत धान्य, उज्ज्वला गॅस योजनेत गॅस कनेक्शन, शेती व उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज, हायमास्ट लॅम्प, शिक्षणाच्या सुविधा, आरोग्य सेवा, तसेच महिलांसाठी दरमहा 1500 इतका भत्ता अशा योजनांमुळे आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. या सर्व योजनांचा लाभ आदिवासींना त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचत असल्याचे अमोल जावळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सुरेश धनके, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, पी.के. महाजन, दिनेश पवार, साई राठोड, रोहन पवार, हरलाल पवार, सुरेश पवार, विनय पवार, अनिल पवार, जितू पवार, चरणसिंग पवार, देवसिंग पवार, गोपाळ नेमाड, सागर भारंबे, हरलाल कोडी, अहमद तडवी, जितू पाटील, मिलिंद नायकोडे, महेश पाटील, विजय महाजन, महेश चौधरी, चेतन पाटील, वासुदेव नरवाडे, श्रीकांत देशमुख, सुनील पाटील यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी जि.प.सदस्य रमेश पाटलांचे समर्थन

  • रावेर आणि रावेरच्या पूर्व भागात आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी विकास कामे केलेली नाहीत, त्यामुळे हा भाग विकासाच्या बाबतीत खूपच मागे आहे. या कारणाने माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांची नाराजी होती. त्यांच्या मते, विकासाच्या कामांकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी विकासाचा मागासलेपण भरून काढण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे रमेश पाटील यांनी महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत रमेश पाटील यांनी आपल्या समर्थनाची घोषणा केली.
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या