Tuesday, May 20, 2025
Homeनाशिकदुर्दैवी घटना : बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला

दुर्दैवी घटना : बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

घरातून बेपत्ता झालेल्या एका ५६ वर्षीय महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी हिरावाडीतील भोरे नाट्यगृहाजवळील जागेत संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता .

भारती माणिकराव वलटे(वय ५६, रा. पंचवटी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. भारती या शुक्रवारी हिरावाडी परिसरातून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांची बेपत्ता असल्याची नाेंद पती माणिकराव वलटे यांनी केली हाेती.

तपास सुरु असतानाच, रविवारी (दि. १९) दुपारी हिरावाडीतील भोरे नाट्यगृहाजवळील मोकळ्या जागेत वलटे यांचा मृतदेह आढळून आला. वलटे यांच्या गळ्याभोवती साडी गुंडाळल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरुवातीस घातपाताची शक्यता वर्तविली गेली.

जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर वलटे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस आता तपास करत आहेत. मृत वलटे यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांची दाेन्ही मुले नाेकरी करतात. याबाबत सखाेल तपास सुरु झाला आहे. 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष

0
नाशिक | Nashik राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल...