Monday, May 27, 2024
Homeनाशिकअनोळखी तरुणाची आत्महत्या

अनोळखी तरुणाची आत्महत्या

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

तालुक्यातील पोखरी शिवारातील रस्त्या लगत असलेल्या झाडाला अज्ञात तरुणांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात आले. प्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव- संभाजीनगर हायवेवर पोखरी शिवारातील रस्त्याच्या कडेला रतन नामदेव देवरे यांच्या शेतातील बांधावर असलेल्या शिसम झाडाला एका अज्ञात तरुणांने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. या अनोळखी तरुणांचे अंदाजे २५ते ३० वय असून अंगात राखाडी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे.याबाबत पोखरी येथील पोलीस पाटील अनंत विष्णू पागे यांनी नांदगाव पोलिसांनी खबर दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

प्राथमिक माहितीनुसार सदर तरुण गेल्या दोन /तीन दिवसापासून या परिसरात भटकंती करीत असल्याचे बोलले जाते. सदर व्यक्तीने आत्महत्या का केली व ती व्यक्ती कुठली आहे या बाबत पोलिसांनी तपास केला असता कुठलाही सुगावा लागलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या