Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्याUnion Budget- 2023 : आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द आणि आकड्यांचा खेळ...

Union Budget- 2023 : आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द आणि आकड्यांचा खेळ – नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. आज सादर झालेला अर्थसंकल्प हा याच कार्यपद्धतीचा भाग आहे.

आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे ठोस काहीही नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती, शेतमालाला किमान आधारभूत किंमत या ज्वलंत प्रश्नावर चकार शब्द अर्थमंत्र्यांनी काढला नाही.

देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, अशी घोणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole)यांनी केली आहे.

देशातील सर्वात जास्त लोकांना रोजगार देणा-या कृषी क्षेत्राला आणि शेतक-यांना अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळाला नाही. ना पीक कर्जाच्या व्याजदरात काही सवलत मिळाली. ना किमान आधारभूत किंमतीबद्दल काही घोषणा केली, ना खते बियाण्यांवरील जीएसटी कमी केला.

ना शेतक-यांचे उत्त्पन्न दुप्पट करण्याचा काही फॉर्म्युला अर्थमंत्र्यांनी दिला. श्री अन्न, रसायन मुक्त नैसर्गिक शेती, किसान ड्रोन, शेतक-यांना डिजीटल आणि हायटेक सेवा अशा आकर्षक शब्दांच्या पलिकडे या अर्थसंकल्पातून शेतक-यांच्या पदरी काही पडले नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या