Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याअर्थमंत्र्यांची युवकांसाठी खुशखबर! पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये मिळणार इंटर्नशिपची...

अर्थमंत्र्यांची युवकांसाठी खुशखबर! पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये मिळणार इंटर्नशिपची संधी

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आज मंगळवारी एनडीए सरकारच्या पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत.या अर्थसंकल्पात सीतारामण यांनी विविध क्षेत्रासाठी तरतूद केली असून रोजगारासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठीही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.यात युवावर्गासाठी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना सीतारामण म्हणाल्या की, अर्थसंकल्पात येणारं संपूर्ण वर्ष आणि त्यापुढील काळ लक्षात घेऊन आम्ही रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करत आहोत. पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या काळात ४.१ कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत पाच योजना आणि उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे.

तसेच सरकार १ कोटी तरुणांना मोठ्या ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देणार आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला ६००० रुपयांच्या अतिरिक्त भत्त्यासह ५००० रुपये भत्ता दिला जाणार आहे. तसेच सर्व क्षेत्रांमध्ये पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना सरकार दोन वर्षांसाठी दरमहा ३०० रुपये अतिरिक्त पीएफ देणार आहे. EPFO मध्ये नोंदणीकृत प्रथमच कर्मचाऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण १५ हजार रुपयांपर्यंत असेल. युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. ३० लाख तरुणांना प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात २ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे, असेही सीतारामण यांनी म्हटले.

तर उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनाही प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा ३० लाख तरुणांना फायदा होणार असून अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत, सरकार EPFO ​​मध्ये योगदानासाठी नियोक्त्यांना दरमहा ३००० रुपये प्रतिपूर्ती पुढील दोन वर्षांसाठी देईल. या योजनेचा लाभ ५० लाख लोकांना होणार आहे, असेही सीतारामण यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...