Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजUnion Budget 2024 : अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज (दि.२३ जुलै) रोजी एनडीए सरकारचा (NDA Government) अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात सीतारामण यांनी शिक्षण, रोजगार,उद्योग, यासह विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या. तसेच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह शेती क्षेत्रासाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्रला रिटर्न गिफ्ट; महाराष्ट्राला मात्र ठेंगा, मविआच्या खासदारांचे आंदोलन

यात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद आणि १ कोटी शेतकऱ्यांना (Farmer) नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असून कृषीक्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्प मांडतांना सीतारामण यांनी सांगितले. तर सोयाबीन, सूर्यफूल बियांची साठवण वाढवण्यावरही भर देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.

हे देखील वाचा : Budget 2024 : अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा; आता ‘इतक्या’ लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

सीतारामण पुढे म्हणाल्या की, ३२ फळ आणि १०९ भाज्यांच्या जाती वितरित करण्यात येणार असून नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे.तर डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर सरकारचा भर असणार आहे.तसेच ग्रामीण विकासासाठी २.६६ लाख कोटी रुपयांची तरतूद असल्याचे निर्मला सीतारामण यांनी सांगितले.तर पंतप्रधान जनजाती उन्नत कार्यक्रमाची घोषणाही यावेळी सीतारामण यांनी केली.

हे देखील वाचा : अर्थमंत्र्यांची युवकांसाठी खुशखबर! पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये मिळणार इंटर्नशिपची संधी

तसेच ६३ हजार गावांमधील ५ कोटी आदिवासींना सहकार्य करण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.तर मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्यात आली असून या योजनेंतर्गत आता १० ऐवजी २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. तसेच रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित ५ योजनांसाठी तब्बल दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.याशिवाय केंद्र सरकारकडून २० लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून कोणत्याही योजनेसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येईल, असेही सीतारामण यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Budget 2024 : अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरु, देशवासीयांचे मानले आभार

त्यासोबतच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधनावर भर दिला जाणार असून त्यामुळे बदलत्या हवामानानुसार पिकांचा विकास होण्यास मदत होणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अतिरिक्त तीन कोटी घरे उभारली जाणार असून अमृतसर-कोलकाता मार्गावर गया इथे विशेष उद्योग कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. तर सिंचन प्रकल्पांसाठी ११, ५०० कोटींची आर्थिक मदत केली जाणार आहे,असेही सीतारामण यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या