मुंबई | Mumbai
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (रविवारी) देशाचा (Budget) अर्थसंकल्प संसदेत सादर केला. जवळपास ५४,४७,३१५ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किती कोटी मिळाले, महाराष्ट्रासाठी काय काय होतं, त्याचा राज्याला कसा फायदा होणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा : PM Narendra Modi : यंदाचा अर्थसंकल्प महिलांच्या शक्तीचे प्रतिबिंब, अनेक संधींसाठी महामार्ग – पंतप्रधान मोदी
ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे (India) दमदार पाऊल टाकणारा आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. असे फडणवीस यांनी म्हटले.
तसेच प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृहांची (Girls Hostel) योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल.मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी पाच हजार कोटी प्रत्येकी ५ वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : राष्ट्रवादी विलीनीकरणावर CM फडणवीसांचा खुलासा; म्हणाले…




