Sunday, February 1, 2026
Homeमुख्य बातम्याUnion Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्या 'या'...

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (रविवारी) नवव्यांदा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) संसदेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या वर्गासाठी काय घोषणा करतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. यानंतर सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडण्यात सुरुवात केली.

- Advertisement -

यावेळी त्या म्हणाल्या की, भारताला जागतिक बायो-फार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी, मी पुढील ५ वर्षांत १०,००० कोटी रुपयांच्या खर्चासह बायो फार्मा शंक्ती योजनेचा प्रस्ताव मांडत आहे. यामुळे बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी एक परिसंस्था निर्माण होईल. तसेच शहरांमध्ये नवीन इकोनॉमिक झोन निर्माण करण्यात येणार असून, देशाची आर्थिक सुधारणा मार्गावर आहे. याशिवाय इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ची सुरुवात करण्यात येणार आहे. यासोबतच उद्योग-नेतृत्वाखालील संशोधन (रिसर्च) आणि प्रशिक्षण केंद्रांवर भर दिला जाईल, जेणेकरून तंत्रज्ञानाधारित आणि कुशल मनुष्यबळ तयार करता येईल, असेही सीतारामन यांनी म्हटले.

YouTube video player

तर जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, आज जग अशा बाह्य वातावरणाचा सामना करत आहे, जिथे व्यापार आणि बहुपक्षीय व्यवस्था दबावाखाली आहेत, संसाधनांपर्यंत पोहोच मर्यादित झाली आहे आणि पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन प्रणालींमध्ये मोठे बदल होत आहेत, तर दुसरीकडे पाणी, ऊर्जा आणि महत्त्वाच्या खनिजांची मागणी झपाट्याने वाढत आहे. आमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत करण्यासाठी ही गती कायम ठेवली जाईल, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा

केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज उत्खनन सुरू करणार.

भारताला औषध निर्मितीचे हब बनवू, बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद

पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि उद्योगांना चालना देणार

इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स – सेमी कंडक्टरसाठी 40,000 कोटींची तरतूद

सरकार दुर्मिळ रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर तयार करणार

जागतिक-मानक औषध नियामक स्थापन करेल

सरकार तीन केमिकल पार्क उभे करणार

आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केमिकल पार्क बांधले जातील

मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर

२० नवे जलमार्ग बनवणार

बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती

वाराणसी आणि पटनामध्ये जहाज केंद्र उभे होणार

सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर : ग्रोथ कनेक्टर्स

मुंबई ते पुणे

पुणे ते हैदराबाद

हैदराबाद ते बंगळुरु

हैदराबाद ते चेन्नई

चेन्नई ते बंगळुरु

दिल्ली ते वाराणसी

वाराणसी ते सिलिगुडी

ताज्या बातम्या

Budget 2026 : अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; १५ हजार शाळांमध्ये...

0
दिल्ली । Delhi केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी अनेक क्रांतिकारी घोषणा केल्या...