Saturday, September 21, 2024
Homeनाशिककेंद्रीय गृहमंत्री अमित शाह 'या' तारखेला नाशिक दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘या’ तारखेला नाशिक दौऱ्यावर

नाशिक | Nashik

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून बैठकांचा सपाटा लावला आहे. त्याच अनुषंगाने भाजपने (BJP) देखील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्रात मिळालेल्या कमी जागांवरून खबरदारी घेत विधानसभेसाठी सावध पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा : Assembly Election 2024 : निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर; ११ उमेदवारांची घोषणा

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे २५ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येत आहेत. या दौऱ्यात ते संघटनात्मक बैठक घेणार असून उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बाहेरील राज्यातून आलेले प्रभारी उपस्थित राहणार आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : तीन मुलांना विहिरीत ढकलून खुनाचा प्रयत्न

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) उत्तर महाराष्ट्रातील ८ पैकी केवळ २ जागांवर महायुतीला (Mahayuti) जिंकता आल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजप या बैठकीत रणनीती आखणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याचे नियोजन हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे करत असून ते आज नाशिकमध्ये आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या