Wednesday, April 2, 2025
Homeब्रेकिंग न्यूजKiren Rijiju On Waqf Board : "वक्फ विधेयक आणले नसते तर संसदेवरही...";...

Kiren Rijiju On Waqf Board : “वक्फ विधेयक आणले नसते तर संसदेवरही…”; मंत्री किरण रिजिजू यांचा मोठा दावा

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी आज वक्फ सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत (Waqf Amendment Bill 2024) सादर केले. त्यावर आता सध्या संसदेत चर्चा सुरू आहे. यावेळी मंत्री किरण रिजिजू वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडत असताना विरोधकांकडून मोठा गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर मंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक आणणे महत्त्वाचे का होते हे सांगितले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले की, “दिल्लीमध्ये (Delhi) १९७० पासून एक खटला सुरू आहे. दिल्ली वक्फ बोर्डाने दिल्लीतील अनेक सरकारी मालमत्तांवर दावा ठोकला होता. तत्कालीन यूपीए सरकारने वक्फ बोर्डाला दिल्लीतील १२३ संपत्ती देऊन टाकल्या होत्या. जर मोदी सरकार (Modi Government) आले नसते तर कदाचित संसदेची इमारत असलेली जागाही वक्फ बोर्डाकडे गेली असती”, असेही त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “वक्फ (सुधारणा) विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा आणि सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून वक्फच्या मालमत्ता नियंत्रित केल्या जाणार नाहीत”, असेही अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले.

तसेच “देशभरात वक्फशी निगडित ३० हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. जगातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. तरीही मुस्लीम गरीब का आहेत? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला. या मालमत्तांचा (Assets) वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हायला हवा होता”, असेही त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Amendment Bill : ‘वक्फ’ म्हणजे काय? विधेयकात नेमकं काय आहे?...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू (Kiran Rijiju) यांनी लोकसभेत...