Sunday, May 19, 2024
Homeजळगावउत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठाने दक्षिण भागाला घातली संवादाची साद : माजी कुलगुरु...

उत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठाने दक्षिण भागाला घातली संवादाची साद : माजी कुलगुरु डॉ.एन.के.ठाकरे

जळगाव jalgaon प्रतिनिधी

कोकणातील (Konkan) भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान (Bhagirath Village Development Foundation) या सामाजिक संस्थेला (social organization) कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्काराने (Poet Bahinabai Chaudhary Awarded) सन्मानित करुन उत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठाने (University of North Maharashtra) दक्षिण भागाला (the south) संवादाची साद (Ease of communication) घातली असून हा संवाद निरंतर वाढीला लागायला हवा असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (North Maharashtra University) प्रथम कुलगुरु (The first Vice-Chancellor) प्रा.डॉ.एन.के.ठाकरे (Prof. Dr. N.K. Thackeray) यांनी केले. 

- Advertisement -

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे या वर्षाचा दिला जाणारा कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मु. पो.झाराप, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेला शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी प्रा.ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. याच समारंभात सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षातील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी- कर्मचारी पुरस्कार देखील देण्यात आले. 

विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात झालेल्या या समारंभात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रूपये ५१ हजार, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रा.ठाकरे म्हणाले की, गिरणा, पांझरा आणि तापीची ही माती सुपीक असून या मातीचा स्तर जसा कसदार आहे तसा या भागातील बुध्दीमत्तेचा स्तर देखील उत्तम आहे.  त्यामुळेच कोकणातील सामाजिक संस्थेला हा पुरस्कार देऊन विद्यापीठाने संवादाची साद घातली आहे.  या पुढच्या काळात एकत्र येऊन संवाद साधणे गरजेचे ठरले आहे. शिक्षणातून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली तर आपोआप शिक्षणाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे श्रम मुल्याचे शिक्षण या विद्यापीठाने द्यावे. नव्या काळात मोठे बदल घडत आहेत.  ज्यांची योग्यता आणि जो खरा संशोधक आहे त्यांना संशोधनासाठी वेळ देण्याची येऊ घातलेली व्यवस्था चांगली असली तरी ती चांगल्या रितीने राबविली जाईल का असा सवाल उपस्थित करुन प्रा.ठाकरे यांनी जागतिक पातळीवरील विद्यापीठांच्या रँकींगचे निकष बदलण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कायम गुणवत्ता जोपासली असून आरक्षण अत्यंत चांगल्या पध्दतीने राबविणारे हे देशातील पहिले विद्यापीठ असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुरस्काराला उत्तर देतांना डॉ.प्रसाद देवधर यांनी या पुरस्काराची ५१ हजार रुपयांची रक्कम कोकणातील जिल्हा परिषद शाळेला देत असल्याचे सांगून हा पुरस्कार समाजाचा आहे असे सांगितले. धूर मुक्ततेसाठी विद्यापीठाने एखादे गाव निवडावे त्या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी भगीरथ मार्फत मदत केली जाईल. कारण बायोगॅस घराघरात उभारणे गरजेचे आहे.  या देशात बायोगॅसची जाहिरात रस्त्यावर जेव्हा दिसेल तेव्हा इंडियातून आपण भारतात आलेलो असू असे ते म्हणाले.

राजकीय व्यवस्थेकडे जायचे नाही, सरकारचा पैसा घ्यायचा नाही आणि कोणाकडेही भीक मागायची नाही ही त्रिसूत्री घेऊन भगीरथ संस्था २३ वर्षापासून उभी आहे.  ग्रामीण विकास आम्ही सोपा करुन सांगतो. एखाद्या गावातील उत्पन्न २० कोटी होईल तेव्हा कोणीही गाव सोडणार नाही असे सांगून डॉ.देवधर यांनी भविष्यात कोकणातून मनीऑर्डर जाईल असा बदल निश्चितपणे घडवणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. 

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु प्रा.ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ साकारले आहे असे सांगून या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजचे आहे. त्यासोबतच आत्मचिंतनही केले पाहिजे असे मत व्यक्त केले.  कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा भगीरथ संस्थेला देत असतांना समाजाला हा भगीरथ पॅटर्न प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. पुरस्कार प्राप्त संस्था, प्राचार्य, शिक्षक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करतांना भवतालचे बदल आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले.  

प्रारंभी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा येाजनेचा राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त स्वयंसेवक प्रतीक कदम यांचा सत्कार करण्यात आला. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वीणा महाजन व प्रा.पुरुषोत्तम पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.  यावेळी मंचावर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल व वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील उपस्थित होते.    

उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व संशोधक पुरस्कार विजेते 

उत्कृष्ट प्राचार्य / संचालक  सन २०१९-२० – प्रा. संजयकुमार बारी, (एच.आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, शिरपूर), सन २०२०-२१ – डॉ. राजेंद्र वाघुळदे (शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव),

उत्कृष्ट महाविद्यालये / परिसंस्था सन २०१९-२० – एच.आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, शिरपूर, सन २०२०-२१ – डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव,

उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय) सन २०१९-२० – १) प्रा. डॉ. प्रकाश लोहार (महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा) २) डॉ. प्रवीण पाटील (एच.आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, शिरपूर),

सन २०२०-२१ – १) डॉ. भुपेंद्र केसुर (मु.जे.महाविद्यालय, जळगाव), २) प्रा.ए.एच. जोबनपुत्रा (पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महा., शहादा),

उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ)  सन २०१९-२०  – प्रा. ए.एम. महाजन (भौतिकीय शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव),

सन २०२०-२१- प्रा.एस.टी. इंगळे (पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव),

उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग-१) सन २०१९-२० – अनिल मनोरे (उपकुलसचिव, प्रशासन विभाग, कबचौउमवि), सन २०२०-२१ – इंजि. एस.आर. पाटील (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, कबचौउमवि),

उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग-२) सन २०१९-२० – डी.एम. महाजन (कक्ष अधिकारी, वित्त विभाग, कबचौउमवि),

सन २०२०-२१ – सुनील हातागडे  (सहा. कुलसचिव, परीक्षा विभाग, कबचौउमवि),

उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग – ३) – सन २०१९-२० – १) गुलाबराव बोरसे (स्वीय सहायक, परीक्षा विभाग, कबचौउमवि), २) एस.के.चौधरी (वरिष्ठ सहायक, कुलसचिव कार्यालय, कबचौउमवि), ३) संजीव पाटील (वरिष्ठ सहायक, प्रशासन विभाग, कबचौउमवि),

सन २०२०-२१ – १) सुहास कुलकर्णी (डी.टी.पी. ऑपरेटर, कबचौउमवि), २) डॉ. अनिलकुमार लोहार (सहायक, प्रशासन विभाग, कबचौउमवि) ३) डॉ. दिनेश लाड (सहायक, परीक्षा विभाग, कबचौउमवि),

उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -४)  सन २०१९-२० – १) निवृत्ती भालेराव (शिपाई, गणितशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), २) इशान जोशी (प्रयोगशाळा परिचर, जैवशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि),

सन २०२०-२१ – १) प्रतिभा पवार (शिपाई, प्रशासन विभाग, कबचौउमवि), २) राजेंद्र सनेर (शिपाई, वित्त विभाग, कबचौउमवि), ३) मिलींद पाटील (प्रयोगशाळा परिचर, युआयसिटी, कबचौउमवि),

उत्कृष्ट अधिकारी (महाविद्यालय वर्ग –२) सन २०१९-२० – मनोज चौधरी (कार्यालयीन अधिक्षक, आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर),

उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग-३) सन २०१९-२० -१) रवींद्र पाटील (कनिष्ठ लिपीक, मु.जे. महाविद्यालय, जळगाव), २) जगदिश चौधरी (वरीष्ठ सहायक, एच.आर.पटेल महिला महाविद्यालय, शिरपूर),

उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -४) सन २०१९-२० – राजेंद्र जाधव (ग्रंथालय परिचर, आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर),

सन २०२०-२१ – डॉ. ऋषिकेश चित्तम (प्रयोग शाळा परिचर, आर.डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी (साक्री) 

विद्यापीठ शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (निधी) सन २०१९- प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि),

प्रकाशन पुरस्कार सन २०१९ – १) प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि) २) प्रा.पी.पी. माहुलीकर (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), ३) प्रा.विकास गीते (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि) ,

संशोधन पुरस्कार (निधी) पेटंट पुरस्कार सन २०१९ आणि २०२० – प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि)

विद्यापीठ शिक्षक संशोधन (प्रकाशन) पुरस्कार सन २०२० – १) – प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि), २) प्रा. ए.एम. महाजन (भौतिकीय शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), ३) प्रा.विकास गीते (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), ४) अमरदीप पाटील (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), ५) डॉ. संजय घोष (भौतिकीय शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि)  

महाविद्यालयीन शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (निधी) सन २०१९ – डॉ.हारूण पटेल (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर) ,

सन २०२० – १) डॉ. विवेकानंद चटप (एच.आर.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), २) डॉ. हितेंद्र महाजन (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर),

संशोधन पुरस्कार सन २०२० – १) डॉ.हारूण पटेल (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), २) डॉ. अतुल शिरखेडकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ३) प्रा. रियाजअली जफरअली सैय्यद (पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा) 

- Advertisment -

ताज्या बातम्या