पेठ । प्रतिनिधी Peth
पेठ शहरातील मध्यवस्तीत असलेल्या गावतळ्यात सकाळी 10 वाजे दरम्यान मृतदेह तरंगत असल्याची माहिती पेठ पोलीसांना मिळाली. घटनास्थळी पो. नि . गोंदके यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असता तलावाच्या पूर्वबाजूच्या कडेस पानवेलीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.
- Advertisement -
25 ते 30 वयोगटातील तरुणाच्या हातावर हेमलता नाव गोंदलेले आहे. मृतदेह कुजल्याने ओळख पटविणे अत्यंत जिकरीचे झाले आहे .
पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाबाबत कुणास माहीती असल्यास पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गोंदके यांनी केले आहे.