श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
पैगंबर जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील काही तरुणांनी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता मिरवणूक काढली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 20 ते 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून विनामास्क करोना आजाराच्या अनुषंगाने करोना आजार पसरू शकतो हे त्यांना माहीत असताना देखील त्यांनी बेजबाबदारपणे वर्तन करून मिरवणुकीस कोणतीही पूर्वपरवानगी न घेता फकीरवाडा कॉलेज रोड, सिद्धार्थनगर, अंडरग्राउंड ब्रीज, नेवासा ते संगमनेर रोडवर हॉटेल राधिकासमोर येऊन मिरवणूक पुन्हा फकीरवाडा, वॉर्ड नं. 1 श्रीरामपूर या मार्गाने मिरवणूक काढली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजू आसाराम महेर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 718/2021 प्रमाणे तौफीक आयूब पठाण (वय 28), अब्दुल अब्बास खान (वय 33), शोएब उस्मान सय्यद (वय 35), अरबाज मस्तान शेख (वय 20), अजीम अमीर मिर्झा (वय 25) सर्व रा. फकीरवाडा, वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर व इतर 10 ते 15 जण यांच्याविरुध्द भादंवि कलम 188, 269, 270 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. हापसे पुढील तपास करीत आहेत.
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपुरात पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान शहरातील शिवाजी चौकात हुल्लडबाजी केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुमारे 60 ते 65 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास पैगंबर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद मिरवणूक वेस्टर्न चौकात शांततेत पार पडली. विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीत सामील झालेला घोडा परत शिवाजी चौक मार्गे सैलानीबाबा दर्गा, गिरमे चौक, वॉर्ड नं. 3 येथे निघाला असता ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील शोएब कुरेशी (रा. वॉर्ड नं. 2), सैफअली शेख (रा. वॉर्ड नं. 1), रजीक असिफ शेख, (रा. वॉर्ड नं. 1), मकसूद शेख, सोनू शहा, शेख जब्बार सय्यद, (रा. लोणार गल्ली, वॉर्ड नं. 6), अरबाज जब्बार सय्यद, (रा. लोणार गल्ली), मुनच्युन सादीक मलिक, (रा. वॉर्ड नं. 2), अमीर राजू सय्यद, (रा. लोणार गल्ली), समीर मोहंमद सय्यद, (रा. लोणार गल्ली, वॉर्ड नं. 6), इम्रान पठाण, अल्ताफ पठाण, तरबेज पटेल, तोहित खान, तन्वीर खान, सद्दाम शेख, इमदाद मिर्झा, जावेद सय्यद, साजिद सय्यद, युसूफ सय्यद, अरबाज शेख, शाहरुख शेख, शाहरुख बागवान, दाऊद तांबोळी, ओसामा जमादार, आदिल मलिक, तौफीक तांबोळी, नेहाल मन्सूर शेख, मुंतुजर कुरेशी, सोहेल शेख, बारीक उर्फ शादाब पठाण, सलीम कुशनवाला, सुफीयाना कुरेशी, (सर्व रा. श्रीरामपूर शहर) यासह अन्य अनोळखी 30 ते 35 तरुणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून बेजबाबदारपणे वर्तन करुन कोणतीही कायदेशीर पूर्वपरवानगी न घेता वेस्टर्न चौकातून शिवाजी महाराज चौक येथे काही वेळ थांबून लोकांचे येणे-जाणेस अटकाव करुन नंतर नगरपालिकेकडे घोषणाबाजी व हुल्लडबाजी, आरडाओरड करत गेले असता त्यांना तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार यांनी पुढे न जाण्याबाबत विनंती केली, परंतु त्यांनी सदर सूचनेची अवहेलना केली व शहरात सार्वजनिक भंग घडवून शांततेचा भंग आणण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ रमीज राजा रफीक आत्तार यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुरनं. 714/2021 नुसार वरील 60 ते 65 जणांविरुध्द भादंवि कलम 143, 145, 188, 341, 269, 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





