Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमदिव्यांगावर अनैसर्गिक अत्याचार; छळ करुन हत्या केल्याचा संशय

दिव्यांगावर अनैसर्गिक अत्याचार; छळ करुन हत्या केल्याचा संशय

नाशिक रोड | प्रतिनिधी
उपनगर भागातील गंधर्व नगरी परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या ङक्टमध्ये आठ वर्षीय दिव्यांग मुलाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि. १९) घडली होती. त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर या मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून, उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सोसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगर येथील गंधर्वनगरी परिसरात इमारतीचे कामकाज सुरु आहे. या इमारतीच्या डक्टमध्ये रविवारी परिसरातीलच ८ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. या मुलाचे सोमवारी (दि.२०) शवविच्छेदन करण्यात आले. त्यात बरगडचा (फासळ्या) तुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तसेच, या दिव्यांग मुलावर त्याच्या अज्ञानतेचा आणि असहायतेचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीकडून वारंवार अनैसर्गिक अत्याचार होत असल्याचे उघड झाले. त्यामुळे या चिमुकल्यावर अज्ञात व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. उपनगर पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisement -

छातीचा पिंजरा फॅक्चर
मूकबधीर असलेल्या या मुलावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीदेखील या मुलाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालात या मुलाच्या बरगड्या तुटल्याने झाल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच तो ज्या डक्टमध्ये पडलेला आढळून आला आहे, तेथे उंबावरून पडल्याने या मुलाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. इमारतीच्या गच्चीवर पतंग, मांजा आढळून आला आहे. त्यामुळे पतंग उडवताना हा मुलगा खाली पडला की त्यास अज्ञात मारेकऱ्याने उंचावरून पाडले, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मुलाच्या मृत्यूचे गूढ़ कायम आहे.

तीन पथके रवाना
शवविच्छेदन अहवालातून अनैसर्गिक अत्याचाराची घटना उघड झाली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या प्राथमिक स्तरावर असून आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. मूल मुलगा कियांग असल्याबाधत त्याच्या शालेय कागदपत्रांच्या आधारे तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु असल्याची परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...