Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकसुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा

घरांचे; फळबागांचे नुकसान

हतगड | वार्ताहर

सुरगाणा तालुक्यात आज दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान जोरदार वादळासह गारांचा पाऊस पडला.

- Advertisement -

दरम्यान, यात अनेक घरांचे छप्पर, पत्रे उडून नुकसान झाले असून घरातील अन्न धान्य संसारपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे देखील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच या वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे आंबा फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या