Thursday, May 30, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाळा, उन्हाळा की हिवाळा? नाशिककर संभ्रमात

पावसाळा, उन्हाळा की हिवाळा? नाशिककर संभ्रमात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने पहाटेपासून झिमझिम पावसात सुरुवात झाली आहे. या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे.सध्याचा हंगाम हा गहू हरभरा काढणी बरोबरच रब्बी  कांदा काढणीचे काम सुरू आहे.

- Advertisement -

मात्र, सुरू झालेल्या अवकाळी पावसाने कांदा भिजत असल्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा कांदा शेतात व उघड्यावर पडून आहे आणि ज्यांच्याकडे कांदा झाकण्यासाठी सुविधा नाही अशा कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

रिमझिम पाऊस व प्रचंड गारवा यामुळे मानवी जीवनावर व आरोग्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे आणि उन्हाळ्याच्या मार्च महिन्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे सध्याचे वातावरण हे हिवाळ्याचे उन्हाळ्याचे की पावसाळ्याचे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे नागरिकांना व जिल्हावासीयांना घराच्या बाहेर पडणे ही मुश्किल झाले आहे घराच्या बाहेर पडताना स्वेटर व उदार कपडे घालूनच आणि छत्री घेऊन बाहेर पडावे लागत आहे. या वातावरणाचा फटका पशुधनालाही बसत असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या