Tuesday, May 6, 2025
Homeनाशिकनिफाड, येवला तालुक्यात गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

निफाड, येवला तालुक्यात गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

 

चांदोरी | वार्ताहर

- Advertisement -

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील चांदोरी, सायखेडा, नागापूर, खेरवाडी परिसरात दुपारी ३ ते ३.३०दरम्यान अचानक वादळी वारा व पावसाने तडका दिला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्याने आणि हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतात काढून ठेवलेलं कांदा, द्राक्ष बागा, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

येवला तालुक्यात गारांसह वादळी पाऊस; कांदा पिकांचे मोठे नुकसान

येवला | प्रतिनिधी
शहर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात नागडे परिसरात गारांसह पाऊस झाला. तर वादळी वाऱ्यासह पावसाने कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आज सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढली होती. मात्र दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या. पंधरा- वीस मिनिटे झालेल्या या पावसाने उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी आज, शहराचा आठवडे बाजार असल्याने बजारकरुंची मोठी धावपळ उडाली. तर ग्रामीण भागात अकस्मात आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली.

अवकाळी व वादळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सावरगाव येथील शेतकरी छगन दावल गोविंद यांची कांदा चाळ वादळी वाऱ्याने उडून गेल्याने 120 क्विंटल कांदा भिजून मोठे नुकसान झाले आहे. जळगाव नेऊर या ठिकाणी विवाह सोहळा सुरू असताना लग्न मंडप देखील उडाला. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले. ग्रामीण भागात सुमारे तासभर वादळी वारा व पाऊस सुरू होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 1400 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 4271 गोण्यांची...