बागलाण । प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील भुयाने,करंजाड,अंतापुर,शेवरे शिवारात, तसेच पश्चिम पट्यासह मांगीतुंगी, मुल्हेर, ताहराबाद परीसरात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह दुपारी चार वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
अर्धा ते पाउन तास वादळीवाऱ्यासह सुरू असलेल्या अवकाळी पावसाने बागलाण तालुक्यातील काढणीला आलेल्या कांद्यासह गव्हाचे व डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे, काही शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतात पडला आहे त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडंही उन्मळून पडली आहेत.
संकटात सापडलेल्या बळीराजाला आत्ता यावर्षी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे,काढणीला आलेला, कांदा, गहू, आंबा या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचणामे करुन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.