दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
एप्रिल आणि मे महिन्यांत दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सहाशे हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. एकशे सत्तावन हेक्टरवरील पिके बांधित झाली आहेत.
नुकसानग्रस्तांमध्ये कांंदा, भुईमूग, मका, पुदिना, शिमला मिर्ची यांसह भाजीपाला पिकांचा समावेश आहे. फुल शेतीचेही मोठे नुकसान झाले असल्याने फुल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर सुरू असून कांदा पिकाचे मोठ्चा प्रमाणात नुकसान होत आहे. याचा परिणाम थेट दरावर झाला आहे. सध्या बाजारात कांद्याला 700 ते 1000 रुपये सरासरी दर मिळत आहे. परंतू पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. गत काही वर्षामध्ये सिंचनाची सोय असलेले शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे तालुक्यात कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यावषी चांगले उत्पादन होईल, अशी शेतकन्यांना अपेक्षा असतानाच मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळला.
तब्बल आठ ते दहा वेळा पाऊस कोसळला असून, दमट वातावरण आहे. त्यामुळे कांदा जमिनीमध्येच कुजत आहे. परिणामी शेतकन्यांना मोठया नुकसानीचा सामना करावा लागत आहे. काही शेतकन्यांचा कांदा काढणीचा खर्चही निघत नाही. बेमोसमी पावसामुळे कांद्याचे भावही घसरले आहेत. एप्रिल महिन्यात तेराशे ते पंधराशे रुपये बाजारभाव असताना या आठवड्यात कांदा पिकाला सध्या बाजारात मिळत असलेला भाव हे उत्पादन खर्चाच्या तुलनेने कमी असल्याने शेतकयांना आता सरकारच्या आधाराची गरज आहे. कांदा खराब होऊ लागल्याने, तसेच चाळीतील कांद्याची घट होऊ लागल्याने शेतकरी मिळेल त्या भावाने उन्हाळी कांदा विक्री करत आहे.
तालुक्यातील जानोरी, मोहाडी, खडकसुकेणे, पालखेड, खेडगाव, आबेदिंडोरी, जऊळके दिंडोरी आदी ठिकाणी गुलाब शेती केली जाते. तालुक्यात 75 हेक्टर क्षेत्राखाली गुलाब शेती केली जाते, तर 15 हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाऊस मध्ये विविध प्रकारच्या गुलाबाची लागवड करून उत्पादन घेतले जात आहे, त्यासाठी एकरी 60 लाख रुपये खर्च येत आहे. उघड्यावरील गुलाबशेती साठी एकरी 5 लाख रुपये खर्च येतो, मात्र अवकाळी पाऊस व वादळीवार्यामुळे 10 ते 12 पॉलिहाऊस जमीनदोस्त झाले तर काहींचा प्लॉस्टिक कागद फाटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
दिंडोरी तालुक्यात पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची माहिती आपण शासनाला कळविली आहे. यावर्षी चांगले भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. परंतू ती फोल ठरली. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करु. तसेच सर्व पिकांचे पंचनामे व्हावे, यासाठी प्रयत्नशील राहु.
राजेंद्र उफाडे, उपसरपंच वरखेडा