येवला | प्रतिनिधी Yeola
- Advertisement -
येवला शहर व परिसरात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात आज, मंगळवारी तालुक्याचा आठवडे बाजार असल्याने अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार सरीने बाजारकरूंची मोठी धावपळ उडाली.
बदापूर परिसरात शेतकरी अशोक पवार यांचा काढणीला आलेला गहू आडवा झाला. तसेच तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या कांद्याची काढणी सुरू असतानाच पाऊस झाल्याने साठवणूक केलेला आणि शेतात असलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




