Friday, November 22, 2024
Homeनाशिक'देशदूत'च्या लिगल नोटीस पोर्टलचे अनावरण

‘देशदूत’च्या लिगल नोटीस पोर्टलचे अनावरण

नाशिक | Nashik

दैनिक ‘देशदूत’च्या (Daily Deshdoot) लिगल नोटीस पोर्टलचे शानदार अनावरण (Unveiling) आज नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे (Nitin Thackeray) व ज्येष्ठ विधिज्ज्ञ जयंत जायभावे यांच्या हस्ते झाले.

- Advertisement -

अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (Nashik Engineering Cluster) येथे झालेल्या या सोहळ्यास जेनकोवालचे अध्यक्ष दीपक पैसास, पॉझिटिव्ह मीटरिंग पंप्स (इं.) प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक सुधीर मुतालिक, दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, अशोका ग्रुपचे जनसंपर्क अधिकारी सतीश आरोटे, ‘देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घाबरे उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. वैशाली बालाजीवले यांनी केले. त्या म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक लिगल नोटीस प्रसिद्ध करण्यात ‘देशदूत’ अग्रेसर आहे. बऱ्याचदा जुन्या नोटिसांचा संदर्भ नागरिकांना आवश्यक असतो. तो संदर्भ एका क्लिकवर उपलब्ध व्हावा, नागरिकांची सोय व्हावी या उद्देशाने ‘देशदूत’ने हे खास पोर्टल आता उपलब्ध करून दिले आहे.

हे देखील वाचा : इच्छाशक्ती असल्यास यश हमखास – घैसास

२००३ पासून आतापर्यंतच्या सर्व लिगल नोटिसा (Notice) यावर वाचता येणार आहेत. त्याचा लाभ नागरिकांना निश्चित होईल. त्यानंतर घैसास यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. काळाची गरज ओळखून हे पोर्टल उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘देशदूत’चे अभिनंदन केले. तसेच त्या जुन्या लिगल नोटिसा कोठूनही वाचता येतील अशी सोय करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बांधकाम व्यावसायिक व जमीन व्यवहाराची सविस्तर माहिती संकलितपणे उपलब्ध करून देणे म्हणजे मोठ्या त्रासातून मुक्ती देण्यासारखे स्तुत्य काम केले आहे. एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देणारे है पोर्टल निश्चितच व्यावसायिकांना लामदायी ठरणार आहे.

दीपक चंदे, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या