Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्याठरलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून नव्हे ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार

ठरलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून नव्हे ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार

दिल्ली | Delhi

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांचे सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले असून राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपाकडून ही पहिली यादी यादी करण्यात आली आहे.

भाजपने ५८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप नेते आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात ३८ ते ५५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे प्रधान यांनी सांगितले.

भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, मथुरा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांना तिकीट दिले आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

तसेच भाजपने पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह यांनाही तिकीट दिलं आहे. या शिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह यांनाही निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या