Monday, July 22, 2024
Homeदेश विदेशविद्येच्या मंदिरात द्वेषाचे धडे! भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला उभं केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना….

विद्येच्या मंदिरात द्वेषाचे धडे! भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला उभं केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना….

मुझफ्फरनगर | Muzaffarnagar

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील (UP News) मुझफ्फरनगरमधल्या (Muzaffarnagar) एका शाळेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाळा चालवणारी महिला शिक्षिका एका मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर मुलांना मारहाण करायला सांगत असल्याचे दिसत आहे.

शिक्षिका एक एक करून इतर विद्यार्थ्यांना बोलावते आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या गालावर चापट मारायला सांगत आहे. विद्यार्थी रडत असतानाही शिक्षिका त्याला मारालायला सांगत आहे. तिथेच बसलेल्या एका व्यक्तीने हे सगळं त्याच्या मोबाईलमध्य कैद केले असून आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खुब्बापूर गावातील हा प्रकार असून पोलिस याप्रकरणी शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहे. शिक्षेकेचे नाव त्रिप्ता त्यागी असं असून त्या नेहा पब्लिक स्कूलच्या शिक्षिका आहेत. पोलिसांनी सांगितलं की त्यांनी व्हिडिओ पाहिला असून शिक्षण विभागाला यावर कारवाई करण्यास सांगितलं आहे. मुलगा मुस्लिम आहे आणि महिलेने धार्मिक द्वेषातून हा प्रकार केलाय का? याचा तपास सुरु आहे. मॅथेमॅटिक टेबल चुकीचा केल्याने महिला शिक्षक मुस्लिम विद्यार्थ्याला शिक्षा देताना दिसत आहे. महिला वर्गातील इतर मुलांना एकानंतर एक असं त्या मुलाला मारायला लावते. मोहम्मदांच्या मुलांकडे त्यांच्या आईने लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, यामुळे या मुलांची अधोगती होत आहे, असं महिला शिक्षक व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.

व्हिडिओ (Viral Video) समोर आल्यानंतर कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) निशाणा साधला आहे. निरागस मुलांच्या मनात भेदभावाचे विष पेरणे, शाळेसारख्या पवित्र जागेला द्वेषाचा बाजार बनवणे, हेच रॉकेल भाजपने पसरवले आहे, यापेक्षा वाईट काहीच नाही.. अशी संतप्त प्रतिक्रया त्यांनी दिली आहे. मुले देशाचे भविष्य आहेत, त्यांचा द्वेष करु नका.. असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या