नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील देवळाली गाव परिसरातील (Deolali Gaon) रोकडोबा वाडी येथे मंगळवारी रात्री अरमान मूनवर शेख (वय १९) रा. सुंदरनगर देवळाली गाव, नाशिकरोड या युवकाचा (Youth) सात जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करून निर्घुण खून केला होता. यानंतर आता सदर खून (Murder) प्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे देखील वाचा : Nashik News : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी काढली थेट तडीपारीची नोटीस
याबाबत अधिक माहिती अशी की,मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रोकडोबा वाडी येथे अरमान शेख या युवकाची जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर सात जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला होता. या घटनेनंतर संशयित आरोपी हे फरार झाले होते. मात्र, उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) तातडीने तपास करून त्यापैकी आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या, रवी जयसिंग राठोड उर्फ चंप्या व संदेश राजू मांग काली उर्फ झिंग्या राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव यांना तातडीने धोबीमळा रोकडोबावाडी (Rokdobawadi) नाशिकरोड येथून अटक केली होती. तर इतर चार आरोपी फरार झाले होते.
हे देखील वाचा : Nashik Crime News : बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी
या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्याचे (Upnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांचे सहकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणजीत नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे, शशिकांत पवार विशाल सपकाळे, सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, गोविंद भामरे, सौरभ लोंढे यांच्यासह आदींनी संशयित आरोपी असलेले आकाश काश्यप तपासे, वय१९, रा. मालधक्का रोड, नाशिकरोड, प्रेम संतोष डेंगळे उर्फ टक्क्यां रा. गुलाबवाडी, नाशिकरोड, सुमित बाळू जाधव उर्फ चिंक्या रा. विहितगाव नाशिकरोड, सम्यक संदीप उनवणे रा. विहितगाव यांना लहवित शिवारातून ताब्यात घेतले.
हे देखील वाचा : Nashik News : माजी आयपीएस सासऱ्याला सुनेची धमकी; मागितली वीस लाखांची खंडणी
दरम्यान, या घटनेतील सर्व आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली आहे. तसेच सदरची घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीने आता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर संशयित आरोपींना २४ तासाच्या आत अटक करण्यात आल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी उपनगर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.