Saturday, April 26, 2025
Homeराजकीयगृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा; सुप्रिया सुळेंनी का केली विनंती?

गृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा; सुप्रिया सुळेंनी का केली विनंती?

मुंबई । Mumbai

माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी, माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना केली आहे. सुप्रिया सुळेंनी ‘एक्स’च्या माध्यमातून ही विनंती केली आहे.

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अनुचित घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे.” असे सुळे यांनी सुरुवातीला आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

हे हि वाचा : मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, घरात सापडले कोट्यावधींचं घबाड

तसेच, “दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.” अशी मागणी करतच खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहंमत्री फडणवीसांना सल्ला दिला आहे.

“यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis” असे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टच्या अखेरिस लिहिले आहे. त्यामुळे खासदार सुळे यांचा सल्ला आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य करून ज्या लोकप्रतिनिधींना पोलीस सुरक्षेची गरज नाही, त्यांची सुरक्षा काढतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे हि वाचा : डॉ. मनोरमा खेडकर यांची कागदपत्रे दिल्ली पोलिसांनी पाथर्डीतून घेतली ताब्यात

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : पाकला एक थेंबही पाणी देणार नाही –...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानसोबत (Pakistan) असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. या करारासंदर्भात शुक्रवारी (दि.२५)...