Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUPSC Exam TimeTable: UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! IAS, NDA, CDSसह महत्वाच्या...

UPSC Exam TimeTable: UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! IAS, NDA, CDSसह महत्वाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशासह राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोरी आली आहे. Union Public Service Commission म्हणजेच UPSC ने 2027 वर्षासाठीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये सिव्हिल सर्व्हिस (IAS), NDA, CDS, इंजिनिअरिंग सर्व्हिसेससह अनेक महत्त्वाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

UPSC च्या नव्या वेळापत्रकानुसार, सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा २३ मे २०२७ रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षा (Mains) २० ऑगस्ट २०२७ पासून सुरू होऊन पाच दिवस चालणार आहे. भारतीय वन सेवा (IFS) प्रारंभिक परीक्षा देखील सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्ससोबतच घेतली जाणार आहे.

- Advertisement -

संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NDA आणि CDS परीक्षांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
NDA/NA परीक्षा (I) – 11 एप्रिल 2027
NDA/NA परीक्षा (II) – 19 सप्टेंबर 2027

CDS परीक्षा (I) – 11 एप्रिल 2027
CDS परीक्षा (II) – 19 सप्टेंबर 2027

इतर महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा
संयुक्त भू-वैज्ञानिक (Prelims) परीक्षा 2027
नोटिफिकेशन: 2 सप्टेंबर 2026
अर्जाची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2026
परीक्षा: 31 जानेवारी 2027

CBI (DSP) LDCE परीक्षा
नोटिफिकेशन: 16 डिसेंबर 2026
अर्जाची अंतिम तारीख: 5 जानेवारी 2027
परीक्षा: 27 फेब्रुवारी 2027

CISF AC (Executive) LDCE परीक्षा
नोटिफिकेशन: 25 नोव्हेंबर 2026
अर्जाची अंतिम तारीख: 15 डिसेंबर 2026
परीक्षा: 13 आणि 14 मार्च 2027

IES/ISS परीक्षा 2027
नोटिफिकेशन: 10 फेब्रुवारी 2027
अर्जाची अंतिम तारीख: 2 मार्च 2027
परीक्षा: 18 ते 20 जून 2027

संपादकीय : २१ मे २०२६ – श्रीमंतांना अभय, गरिबांना फास!

CAPF (AC) परीक्षा 2027
नोटिफिकेशन: 17 फेब्रुवारी 2027
अर्जाची अंतिम तारीख: 9 मार्च 2027
परीक्षा: 4 जुलै 2027

Combined Medical Services परीक्षा 2027
नोटिफिकेशन: 3 मार्च 2027
अर्जाची अंतिम तारीख: 23 मार्च 2027
परीक्षा: 18 जुलै 2027

इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षा कधी?
इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रिलिम्स परीक्षा 31 जानेवारी 2027 रोजी, तर मुख्य परीक्षा 18 जून 2027 रोजी होणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गोकुळ गिते रवाना;...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) हे...