Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजलबाडी, गैरवर्तन पडलं महागात; पूजा खेडकरवर UPSC ची कठोर कारवाई, गुन्हा दाखल

लबाडी, गैरवर्तन पडलं महागात; पूजा खेडकरवर UPSC ची कठोर कारवाई, गुन्हा दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पूजा खेडकर यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकर यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल सिव्हिलची उमेदवारी रद्द का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून चौकशीला देखील सुरवात करण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहे. दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे. वडिलांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. यामुळे पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

- Advertisement -

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-२०२२ मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती शिफारस केली होती. दरम्यान सध्या सुरू असलेल्या प्रकरणात पूजा खेडकर यांच्या गैरवर्तनाचा UPSC ने सखोल तपास केला आहे. या तपासात पूजा खेडकर यांनी त्यांचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून ओळख लपवून आयोगाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

Image

त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ने पोलीस अधिकाऱ्यांकडे FIR दाखल करून फौजदारी खटल्यासह कारवाई सुरू केली आहे. तसेच त्यांची सिव्हिलची उमेदवारी रद्द का करून नये, अशी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. सरळ सेवा परीक्षा २०२२ आणि नागरी सेवा परीक्षा-२०२२ च्या नियमांनुसार, भविष्यातील परीक्षा आणि निवड यावरही बंदी घालण्यात आली आहे.

पूजा खेडकर विरोधात आता सरळ संघ लोकसेवा आयोगाने कारवाई सुरु केली आहे. यामुळे पूजा खेडकर यांची आयएएस म्हणून झालेली निवड रद्द होण्याची शक्यता आहे. गाडी, कॅबिन, खासगी गाडीवर अंबर दिवा हे प्रकार करणारी पूजा खेडकर यांची निवडच धोक्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या