Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशUPSC ची धुरा निवृत्त IAS महिलेच्या हाती!

UPSC ची धुरा निवृत्त IAS महिलेच्या हाती!

दिल्ली । Delhi

- Advertisement -

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सध्या देशभरात चर्चेत आहे. याच आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी (Manoj Soni) कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच राजीनामा दिला. त्यांच्या जागी आता आयएएस (IAS) अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या १९८३ च्या बॅचच्या IAS अधिकारी असून, प्रीती सुदान १ ऑगस्टपासून यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. २०२२ पासून यूपीएससीच्या सदस्य असलेल्या प्रीती यांनी माजी आरोग्य सचिवपद भूषवले होते. प्रीती यांनी अन्न प्रक्रिया आणि सार्वजनिक वितरण विभागात काम केले आहे.

हे देखील वाचा : Yashashri Shinde Murder Case : आरोपी दाऊद शेखला पोलीस कोठडी; हत्येचे कारणही सांगितलं

याशिवाय त्यांनी महिला आणि बाल विकास विभाग आणि संरक्षण मंत्रालयातही काम केले आहे. सुदान यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून अर्थशास्त्रात एम.फिल. आणि सामाजिक धोरण आणि नियोजन मध्ये M.Sc. पदवी प्राप्त केली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत यांसारख्या प्रमुख कार्यक्रमा मागे प्रीती आहे. त्यांच्यामुळेच नॅशनल मेडिकल कमिशन, ई-सिगारेटवर बंदी असे महत्त्वाचे कायदे करण्यात आले.

हे देखील वाचा : इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाचा भडका उडणार; हमासच्या प्रमुखाची हत्या

दरम्यान, मनोज सोनी यांचा कार्यकाळ २०२९ मध्ये संपणार होता, त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे पूजा खेडकर हे प्रकरण ताजे असताना त्यांनी राजीनामा दिला. परंतु वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मनोज सोनी २०१७ मध्ये UPSC सदस्य म्हणून रुजू झाले. १६ मे २०२३ रोजी त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले. केंद्रीय लोकसेवा आयोगात रुजू होण्यापूर्वी सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून तीन वेळा काम केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या