Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

धक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

दिल्ली | Delhi

एका डेअरी फार्ममध्ये (Dairy Farm) भीषण स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत होरपळून १८ हजारहून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आजवरच्या अमेरिकेन इतिहासातील हा सर्वांत मोठा रक्तपात आहे. अमेरिकेतील टेक्सास (Texas) येथे भीषण दुर्घटना घडली आहे. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

टेक्सासमधील डिमिट येथील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये मंगळवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगी १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते.

पुन्हा राजकीय भूकंप? १५ आमदार बाद होणार अन् अजित पवार भाजपसोबत जाणार…

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. मात्र, तोपर्यंत १८ हजारांहून अधिक गायींचा होरपळून मृत्यू झाला.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार… IMD ने स्कायमेटचा अंदाज खोडला?

साउथ फोर्क डेअरी फार्म कॅस्ट्रो काउंटीमध्ये आहे. टेक्सासमधील सर्वात मोठ्या डेअरी उत्पादक देशांपैकी हा एक आहे. टेक्सासच्या २०२१ च्या अहवालानुसार, कॅस्ट्रो काउंटीमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त गुरे आहेत. गायीची सरासरी किंमत दोन हजार डॉलर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाल्याने शेतीचा संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे.

PHOTO : बाबासाहेबांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का?

अमेरिकेतील सर्वात जुन्या प्राणी संरक्षण गटांपैकी एक असलेल्या अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूट (AWI) ने या आगीचे वर्णन भीषण केलं आहे. तसेच गोठ्यातील आग रोखण्यासाठी फेडरल कायद्यांची मागणी केली आहे. ज्यामुळे दरवर्षी हजारो जनावरे मारली जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या