Saturday, July 25, 2026
Homeदेश विदेशUS-Iran Peace Deal: युद्ध थांबल्याची फक्त घोषणा! शेअर बाजार सुसाट, गुंतवणुकदारांची अवघ्या...

US-Iran Peace Deal: युद्ध थांबल्याची फक्त घोषणा! शेअर बाजार सुसाट, गुंतवणुकदारांची अवघ्या काही सेकंदात ८ लाख कोटींची कमाई

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका-इराणमध्ये शांती कराराची घोषणा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल मिडियावरुन दोन्ही देशांदरम्यानचे युद्ध थांबल्याची घोषणा केलीय. यासोबतच हॉर्मुज सामुद्रधुनी जवळची नाकाबंदी तात्काळ हटवायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जगाच्या कच्चा तेलाच्या आवश्यकतेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा समुद्री मार्ग खुला होणार आहे. या कराराची घोषणा होताच कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारात बघायला मिळाला आहे. आशियाई शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळत आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात गुंतवणुकदारांत मोठा उत्साह पहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीत दीड-दीड टक्क्यांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स १,१२६.३६ अंकांच्या म्हणजेच १.४९ टक्के तेजीसह ७६,६५४.३१ च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, निफ्टी ३३९.२५ अंकांनी म्हणजेच १.४४ टक्क्यांनी वधारून २३,९६२.१५ च्या पातळीवर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीनं २४,००० चा महत्त्वाचा टप्पा पुन्हा ओलांडल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह आणखी वाढला. निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्येही दीड टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. विशेषतः फायनान्शिअल, एव्हिएशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.

- Advertisement -

मागच्या आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स अखेरच्या सत्रात 1695 अंकांच्या चांगल्या उसळीसह 75,527.95 लेवलवर बंद झालेला. तेच NSE Nifty 461 अंकांच्या वाढीसह 23,622.90 वर बंद झालेला. शेअर मार्केटमधल्या या सकारात्मक वातावरणामुळे बीएसई लार्ज कॅपमधील 30 कंपन्यांच्या शेअर्सनी ग्रीन झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात केली आहे.

सर्वात मोठी बातमी! अमेरिका-इराण युद्ध थांबलं; संघर्ष समाप्तीची डोनाल्ड ट्रम्पकडून घोषणा, कच्चा तेलाच्या किमती गडगडल्या

फार्मा सेक्टर सोडून इतर सर्व निफ्टी निर्देशांक तेजीत आहेत. रिअल्टी सेक्टर देखील दीड टक्क्यांनी वाढला आहे. पीएसयू बँक निर्देशांक २ टक्क्यांनी अधिक झाला. निफ्टी ऑटो २ टक्क्यांनी वाढले. एफएमसीजी, आयटी मेटल निर्देशांकात देखील तेजी दिसून आली. शेअर बाजारातील तेजी पाहता बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य ८ लाख कोटींनी वाढले आहे.

बँकिंग क्षेत्रात बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये १% ते ३% पर्यंतची शानदार वाढ पाहायला मिळत आहे. यासोबतच रिलायन्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारखे मोठे शेअर्सही ग्रीन झोनमध्ये होते.

अमेरिका-इराण करारानंतर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयातही मोठी सुधारणा झाली आहे. सोमवारी भारतीय रुपया मजबूत वाढीसह खुला झाला. सध्या भारतीय रुपया ५२ पैशांनी मजबूत होऊन ९४.५७ प्रति डॉलरच्या पातळीवर आला.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...