Saturday, November 16, 2024
HomeनगरAhmednagar District Bank : सन्ड्री खात्याचा सस्पेन्स खात्याप्रमाणे वापर

Ahmednagar District Bank : सन्ड्री खात्याचा सस्पेन्स खात्याप्रमाणे वापर

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा बँकेचे (Ahmednagar District Bank) व्यवहार, कर्ज वाटपासह अनेक बाबींवर सहकार खात्याने आक्षेप घेतलेले आहेत. एकेक मुद्दा बँकेबाबत संशयाचे धुके अधिक गडद करताना दिसत आहे.

- Advertisement -

विभागीय सहनिबंधक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आक्षेपात जिल्हा बँक प्रशासनाने सन्ड्री बँकिंग अकाउंट तयार करून त्याचा सस्पेन्स अकाउंटप्रमाणे वापर केला असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमुद करण्यात आले आहे. खात्यावरून करण्यात आलेल्या व्यवहारांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याचे मतही नोंदवण्यात आले आहे.

जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारांबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत नगरच्या सहकार विभागाने नाशिकच्या सहनिबंधक यांच्याकडे पत्र पाठवल्यानंतर सहनिबंधक यांच्यावतीने बँकेच्या आर्थिक मुद्यावर बोट ठेवण्यात आले आहे. बँकेच्या या व्यवहारांची चौकशी सुरू असतांना संचालक मंडळाने भरतीचा डाव टाकला आहे.

हे हि वाचा : नोटाबंदीतील कोट्यवधींचे गौडबंगाल आजही अनुत्तरीत

भरतीचा डाव हा जिल्हा बँकेच्या चौकशीकडून लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याची शंका एका नेत्याने व्यक्त केली आहे. याबाबत बँकेच्यावतीने प्रतिक्रिया देणे टाळण्यात आले असून प्रशासकीय पातळीवर नाशिकच्या सहकार खात्याने उपस्थित केलेल्या आक्षेपांच्या आधारे त्यांना कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा बँकेच्या वाढलेला एनपीए यासह अयोग्य पध्दतीचे शेती आणि साखर कारखाना कर्जवाटप हे राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचे ठरत आहे. यात सगळेच ‘भाऊ-भाऊ’ असल्याने कोणी कोणा विरोधात बोलावे, असा प्रश्न आहे. यासह बँकेतील अन्य कर्जप्रकरणांची चौकशी होणे गरजेचे आहे.

हे हि वाचा : जिल्हा बँक : मागील वर्षीच्या नफ्यातही कोटीकोटींची ‘बनवाबनवी’?

यात दुभती जनावरे घेण्यासाठीचे कर्ज, महिला बचत गट कर्जाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात सहकार खात्याचे अद्याप त्याकडे लक्ष गेलेले नाही. या प्रकरणाची देखील आता यानिमित्ताने चौकशी होणे आवश्यक असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तसेच अलिकडच्या काही वर्षात बँकेचा इतर खर्चही वाढत आहे. तो वाढण्याचे कारण काय? याचा शोध यानिमित्ताने घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेबाबत सहकार खात्याने घेतलेल्या आक्षेपात बँकेने सन्ड्री बँकिंग अकाउंट तयार करून त्याचा त्याचा सस्पेन्स खात्यासारखा वापर केलेला आहे. मागील आर्थिक वर्षात या खात्यावर बँकेच्यावतीने ७० कोटी २९ लाखांची रक्कम जमा तर ५३ कोटी २३ लाखांची रक्कम नावे टाकण्यात आलेली आहे.

हे हि वाचा : राज्य बँकेतील मुदत ठेवी 1 हजार कोटींनी घटल्या!

मात्र, या व्यवहारांचा कोणताही ताळमेळ नाही. ही बाब लेखा परिक्षण अहवालात नमुद कदण्यात आलेली आहे. या व्यवहारांची बँक पातळीवर स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असतांना सदरचे खाते नावे व जमेचे व्यवहार नोंदवून हिशोबातून बाहेर तथवा वाईपआऊट करण्यात आले असल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे.

बँकेची भूमिका

जिल्हा बँकेची भरती असो अथवा सहकार खात्याने घेतलेले आक्षेप यावर बँकेच्या संचालक मंडळासह प्रशासन देखील गप्प आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, अशी भूमिका बँकेने घेतल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या विविध निर्णयांचे गुढ अधिकच वाढताना दिसत आहे.

हे हि वाचा : जिल्हा बँकेच्या वर्तुळात ‘हलचल’

मुंबईपर्यंत चर्चा

राज्यात सर्वात चांगली आणि मोठी बँक म्हणून नगर जिल्हा सहकारी बँकेची ओळख आजवर होती. यामुळे राज्याचे लक्ष नेहमी याठिकाणी होणाऱ्या कारभाराकडे राहिलेले आहे. मात्र, सध्या बँकेच्या विविध निर्णय आणि भूमिकांबाबत मुंबईपर्यंत चर्चा असून पुढे काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागू आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या