Thursday, November 12, 2026
Homeदेश विदेशUP Elections: उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवं समिकरण उदयास; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर

UP Elections: उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवं समिकरण उदयास; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर

नवी दिल्ली | New Delhi
आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आज गुरुवारी (१२ नोव्हेंबर २०२६) एक मोठे समीकरण उदयास आले आहे. आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझाद आणि ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. औवेसी आणि चंद्रशेखर आझाद यांनी सामाजिक परिवर्तन मोर्चाची घोषणा केली.

ही तिसरी आघाडी नसून पहिली मजबूत आघाडी
ओवैसी आणि आझाद यांनी या आघाडीची घोषणा केली. ही तिसरी आघाडी नसून पहिली मजबूत आघाडी आहे, असे आझाद म्हणाले. मोठ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याला कमकुवत समजले गेले. आता आम्ही अपमान सहन करणार नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनेही या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आझाद यांनी केले.

- Advertisement -

माबाई आंबेडकर मैदानावर भव्य ‘सत्ता परिवर्तन रॅलीचे आयोजन
आझाद पुढे म्हणाले, सध्या यात दोन पक्ष असले तरी जसजसे शोषित, पीडित आणि वंचित घटक याच्याशी जोडले जातील, तसतसा हा मोर्चा अधिक मजबूत होत जाईल.” या मोर्चाच्या माध्यमातून २६ नोव्हेंबर रोजी लखनौच्या रमाबाई आंबेडकर मैदानावर भव्य ‘सत्ता परिवर्तन रॅली’ आयोजित केली जाणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४०३ जागा लढवण्याची तयारी असल्याचे आझाद यांनी सांगितले. तसेच, भाजपला रोखण्यासाठी इतर समविचारी पक्षांनी सोबत यायचे असल्यास त्यांचे स्वागतच असेल, असेही त्यांनी नमूद केले.\

#WATCH | Uttar Pradesh | Azad Samaj Party-Kanshiram President and MP, Chandrashekhar Azad and AIMIM chief Asaduddin Owaisi form ‘Samajik Parivartan Morcha’ for UP polls

AIMIM chief Asaduddin Owaisi says, “We have decided to form ‘Samajik Parivartan Morcha’. I can say with confidence this will be a strong Morcha to stop the BJP from coming to power in UP for the third time.”— ANI (@ANI) November 12, 2026

चंद्रशेखर आझाद असतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा
असदुद्दीन ओवैसी यांनी चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी घोषणा केली. राज्यात भाजपला रोखण्यासाठी सामाजिक परिवर्तन मोर्चा हा मजबूत पर्याय असेल, असेही ते म्हणाले. आतापर्यंत त्यांच्या समाजातील लोकांचा वापर फक्त मतदार म्हणून करण्यात आला आहे, असे सांगतानाच आता ही आघाडी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तन मोर्चा राज्यातील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. “आम्ही भूतकाळाचे नाही तर भविष्याचे राजकारण करणार आहोत. बेरोजगार तरुण, शेतकरी आणि मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा मोर्चा कटिबद्ध आहे.” असेही ते म्हणाले.

मुंबईत अनेक रेल्वे स्टेशनवर वाजली भोजपूरी गाणी; प्रवाशांचा संतापानंतर रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण, म्हणाले…

यावेळी ओवैसी यांनी समाजवादी पक्षावरही (सपा) निशाणा साधला. अल्पसंख्याकांची ९० टक्के मते मिळवूनही सपा भाजपचा पराभव करू शकली नाही आणि पुढेही करू शकणार नाही, अशी टीका ओवैसी यांनी केली. उत्तर प्रदेशातील दलित आणि मुस्लिम मतदारांची मोठी संख्या पाहता, आझाद आणि ओवैसी यांच्या या नव्या युतीमुळे राज्यातील आगामी निवडणुकांची समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

Sunil Tatkare : “दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चेत…”; तटकरे स्पष्टच बोलले, नेमकं...

0
मुंबई | Mumbai राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत (NCP Merger Rumors) सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार...