नवी दिल्ली | New Delhi
उत्तराखंड (Uttarakhand) येथील उत्तरकाशीमध्ये (Uttarkashi) खीर गंगा नदीला (Kheer Ganga River) मोठा पूर (Flood) आल्याने ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असून, आपत्ती व्यवस्थापनाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगोत्री धामला जाताना मुख्य थांबा असलेल्या धराली येथील खीर गंगा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे जवळपास ५० हॉटेल्स आणि घरे उद्ध्वस्त झाले आहेत. या पुरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच या पुराच्या घटनेचा २० सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे. त्यामध्ये भूस्खलनमुळे दरड कोसळल्याचे दिसत आहे.
तसेच पाणी वाऱ्याच्या वेगाने गावात घुसल्याचे बघायला मिळत आहे. याशिवाय पाण्यात (Water) घरे वाहून जात असतानाही दिसत आहे. पावसामुळे उत्तरकाशीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे धाराली बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक नागरिक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. पुरामुळे खीर गंगेच्या काठावर असलेले प्राचीन कल्प केदार मंदिरही ढिगाऱ्याखाली गेल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान , उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amiti Shah) यांनी फोनवर चर्चा केली आहे. दोघांमध्ये धराली गावामध्ये (Dhrali Village) झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाच्या मदतीने बचावकार्य वेगात सुरू आहे.
५० हून अधिक जण बेपत्ता झाल्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, पूराचे पाणी अनेक हॉटेलांमध्ये शिरले आहे. पुराच्या पाण्यासह ढिगारा घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसला आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती आहे. तसेच,५० हून अधिक जण बेपत्ता झाल्याची शक्यता आहे.




