Saturday, May 18, 2024
Homeजळगावजामनेर तालुक्यासाठी "व्हक्सीनेशन ऑन व्हील"

जामनेर तालुक्यासाठी “व्हक्सीनेशन ऑन व्हील”

वाकडी. Wakadi ता जामनेर

लसीकरणाचा (Vaccination) टक्का वाढवा व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लसीकरणाची सुविधा पोहचवावी या उद्देशाने जामनेर तालुक्यासाठी “व्हॅक्सीनेशन व्हॅन” (Vaccination van) जिल्हास्तरावरून प्राप्त झाली आहे. नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या हस्ते सदर वाहनाचे जिल्हास्तरावर लोकार्पण करण्यात आले.

- Advertisement -

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना ची तिसरी लाट येऊन ठेपली असतांना सुद्धा बऱ्याच नागरिकांचे लसीकरण अजून सुद्धा पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे तरी काही ठिकाणी नागरिकांची दिरंगाई यामुळे तालुक्यात अजून सुद्धा १००% लसीकरण झालेले नाही.

सदर वाहन हे ठरवून दिलेल्या गावांना जाऊन तेथील नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण करणार आहे.वाहनासोबत वैद्यकीय अधिकारी, दोन संगणक परिचालक,दोन लस टोचक व एक टीम को-ऑडीनेटर उपलब्ध आहे.

आज तळेगांव येथे “व्हॅक्सीनेशन व्हॅन” द्वारे कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले.सदर शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.मनोज तेली,तालुका मलेरिया सुपरवायझर व्ही.एच.माळी यांनी भेट दिली. यानंतर सदर व्हॅक्सीनेशन व्हॅन द्वारे गावोगावी जाऊन कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.सोनवणे यांनी याप्रसंगी दिली.

डॉ.आश्विनी वाघ,दुर्गा चौधरी,रंजना कांबळे, गीताबाई माळी, सविता पाटील यांनी व्हॅक्सीनेशन व्हॅन च्या टीमला सहकार्य केले.ग्रामपंचायत तळेगांव यांच्यावतीने सरपंच आरती कोळी व ग्रामसेवक रविंद्र तायडे यांनी व्हॅक्सीनेशन टीम मधील डॉ.चंद्रामणी सुरवाडे, पंकज गुरव,प्रसाद कोळी,हनुमंत नागरगोजे, वैशाली चव्हाण, ज्योती वाकोडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या